Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजारात लाल तर नागपूर येथे पांढऱ्या कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:25 IST

Kanda Bajar Bhav : राज्याच्या बाजार समित्यात आज एकूण १,४२, ८६९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १,२९,५३९ क्विंटल लाल, १८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ११९० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आज गुरुवारी (दि.२९) रोजी राज्यातील अनेक बाजारात लिलाल बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान लिलाल झालेल्या राज्याच्या बाजार समित्यात आज एकूण १,४२, ८६९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १,२९,५३९ क्विंटल लाल, १८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ११९० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ८०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच येवला येथे ११००, संगमनेर येथे ११००, मनमाड येथे १२५०, राहुरी-वांबोरी येथे ११०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

तसेच पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे कमीत कमी १८०० तर सरासरी २१००, लोकल वाणाच्या कांद्याला कामठी येथे कमीत कमी २०६ तर सरासरी २३१०, कल्याण येथे नं.१ कांद्याला १६५०, नं.२ कांद्याला १४५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.

याशिवाय अकोला येथे १३००, छत्रपती संभाजीनगर येथे ९००, चंद्रपूर-गंजवड येथे २२००, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे कमीत कमी १००० तर सरासरी २२०० रुपयांचा प्रती क्विंटल दर कांद्याला आज मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर     

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2026
अकोला---क्विंटल56550020001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल31073001500900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल447200025002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7997100020001500
सोलापूरलालक्विंटल536691002200800
येवलालालक्विंटल1500020012501100
येवला -आंदरसूललालक्विंटल400025113511080
धुळेलालक्विंटल15024001400850
लासलगाव - विंचूरलालक्विंटल750060015361260
जळगावलालक्विंटल19745001425950
नागपूरलालक्विंटल1190120016001500
राहूरी -वांबोरीलालक्विंटल862810017001100
संगमनेरलालक्विंटल143782001700950
मनमाडलालक्विंटल1000030014001250
कोपरगावलालक्विंटल478050013391100
कोपरगावलालक्विंटल688050013001150
भुसावळलालक्विंटल3080012001000
हिंगणालालक्विंटल8100020001500
कामठीलोकलक्विंटल1820625602310
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
कल्याणनं. २क्विंटल3140015001450
नागपूरपांढराक्विंटल1190180022002100

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर 

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur sees red onion inflow, Nagpur leads in white onion.

Web Summary : Red onions dominate Solapur market; average rate ₹800/quintal. Nagpur leads in white onion arrivals, prices average ₹2100. Overall onion arrival 1,42,869 quintals in state markets.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती क्षेत्रनाशिकअहिल्यानगर