Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > बाजारात लाल मिरची खातेय भाव; यंदा 'उत्पादनात घट, आवक कमी'चा परिणाम

बाजारात लाल मिरची खातेय भाव; यंदा 'उत्पादनात घट, आवक कमी'चा परिणाम

Red chilli prices in the market are falling; this year the result of 'decrease in production, low arrivals' | बाजारात लाल मिरची खातेय भाव; यंदा 'उत्पादनात घट, आवक कमी'चा परिणाम

बाजारात लाल मिरची खातेय भाव; यंदा 'उत्पादनात घट, आवक कमी'चा परिणाम

Mirchi Bajar Bhav : रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत ठसक्याची चव देणारी लाल मिरची यंदा बाजारात देखील भाव खात आहे. परतीच्या पावसाचा फटका आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

Mirchi Bajar Bhav : रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत ठसक्याची चव देणारी लाल मिरची यंदा बाजारात देखील भाव खात आहे. परतीच्या पावसाचा फटका आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत ठसक्याची चव देणारी लाल मिरची यंदा बाजारात देखील भाव खात आहे. परतीच्या पावसाचा फटका आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

परिणामी, बाजारात आवक कमी झाली असून, दर झपाट्याने वाढले आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख उत्पादक राज्यांत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.

आंध्र प्रदेशातील गुंटूर व खमाम, तेलंगणातील वारंगल, तसेच कर्नाटकातील खंडगी व हुबळी येथे देशातील प्रमुख मिरची बाजार भरतात. येथून देशांतर्गत, तसेच अमेरिका, चीन आदी देशांत निर्यात केली जाते.

दररोज सुमारे ६ ते ७ लाख गोण्या मिरचीची उलाढाल होत असते. मात्र, यंदा ही आवक मात्र जवळपास निम्म्यावर आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी दर तेजीत आहे.  

किरकोळ बाजारातील मिरचीचे 'भाव' काय?

प्रकार २०२५ २०२६ (प्र. क्विं.)
बेडगी३८० ते ४०० ५०० ते ५५० 
चपाटा२०० ते २५० ४५० ते ५०० 
रसगुल्ला३०० ते ३५० ५०० ते ५५० 
सी ५ १५० ते २०० ३०० ते ३५० 

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

Web Title : उत्पादन घटने, कम आपूर्ति से लाल मिर्च के दाम आसमान पर।

Web Summary : तेलंगाना और आंध्र प्रदेश जैसे प्रमुख उत्पादक राज्यों में बेमौसम बारिश के कारण लाल मिर्च का उत्पादन कम होने से कीमतें बढ़ रही हैं। बाजार में आवक आधी हो गई है, जिससे घरेलू और निर्यात बाजार प्रभावित हुए हैं। बेडगी मिर्च की कीमतें ₹500-550/क्विंटल हैं।

Web Title : Red chili prices soar due to reduced production, low supply.

Web Summary : Red chili prices are rising due to lower production caused by unseasonal rains in key producing states like Telangana and Andhra Pradesh. Market arrivals have halved, impacting domestic and export markets. Bedgi chili prices range from ₹500-550/quintal.