Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:37 IST

lal mirchi bajar bhav मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

lal mirchi market मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

त्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. आवक कमी झाल्याने मोठी दरवाढ झाली आहे. सांगली शहरात मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत.

पावसामुळे शेतकऱ्यांकडील मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे बाजारात मालाची आवक घटली आहे.

मागणी वाढल्याने दराने मोठी उसळी घेतली असल्याची माहिती सांगली मार्केट यार्ड येथील मिरची व्यापारी गणेश आटपाडकर यांनी दिली.

बाजारातील मिरचीचा दर (प्रतिकिलो)मिरचीचा प्रकार - सध्याचा दर - पूर्वीचा दरलवंगी मिरची - २१० ते २४० - १५० ते २१०बेडगी मिरची - २०० ते २५० - ३०० ते ५००शंकेश्वर मिरची - १५० ते १८० - २०० ते २५०

अधिक वाचा: सौरपंप मिळण्यास होतोय उशीर! पुरवठादाराची निवड करताना शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ

English
हिंदी सारांश
Web Title : Red chili prices soar due to crop damage, supply crunch.

Web Summary : Sangli's chili prices surged 60% due to rain-damaged crops and reduced market supply. Demand increased, causing prices to spike. Lavangi chilies fetch the highest rates.
टॅग्स :मिरचीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसांगलीपाऊसशेतकरीशेती