Join us

Red Chilli Market : लाल मिरचीने उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू; दरात कमालीची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:45 IST

Red Chilli Market Price : लाल मिरची नेहमी तिखट असते; मात्र, सध्या ग्राहकांसाठी तिखटही गोड झाले आहे... कारण, मागील तीन महिन्यांत लाल मिरचीचे भाव प्रकारानुसार क्विंटलमागे ५० ते ८५० रुपयांपर्यंत घसरले आहेत.

प्रशांत तेलवाडकर

छत्रपती संभाजीनगर : लाल मिरची नेहमी तिखट असते; मात्र, सध्या ग्राहकांसाठी तिखटही गोड झाले आहे... कारण, मागील तीन महिन्यांत लाल मिरचीचे भाव प्रकारानुसार क्विंटलमागे ५० ते ८५० रुपयांपर्यंत घसरले आहेत.

परिणामी, उत्पादक व व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला असून, त्यांच्या डोळ्यात मात्र खऱ्या अर्थाने लाल मिरचीने अश्रू आणले आहेत.

रेडिमेड तिखटाचे भाव स्थिर

मागील ३ महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाल मिरचीत मंदी आली आहे. पण रेडिमेड तिखट बनविणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे भाव स्थिर ठेवले. मिरची पावडर २८० ते ४०० रु. किलो आहे.

का घसरले मिरचीचे भाव ?

१) लाल मिरचीचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान असतो.

२) सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश व तेलंगाणा या दोन राज्यांत होते.

३) मागील वर्षी हंगामात लाल मिरचीचे उत्पादन वाढले होते.

४) त्यात निर्यातही कमी झाली.

५) यंदा नवीन हंगामाला पुढील महिन्यात सुरुवात होत आहे.

६) देशातील ठिकठिकाणच्या शीतगृहात व बाजारपेठेत कोट्यवधींच्या लाल मिरचीचा साठा शिल्लक आहे.

नवीन लाल मिरची पुढील महिन्यात

नवीन लाल मिरचीची आवक फेब्रुवारीत सुरू होईल. रेडिमेड तिखट खरेदी करण्याचा जमाना असला तरी आजही अनेक कुटुंबे उन्हाळ्यात वार्षिक तिखट तयार करून ठेवतात. यामुळे फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान उलाढाल मोठी होते. मागील ३ महिन्यांत जुन्या लाल मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. नवीन हंगामाच्या तोंडावरच मंदी आल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. - स्वप्नील मुगदिया, लाल मिरचीचे व्यापारी.

मिरचीच्या भावातील फरक

मिरची मार्च २०२४ दर जानेवारी २०२५ दर 
रसगुल्ला१००० ते १२००३५० ते ४००
लवंगी२५० ते ३००२०० ते २५०
गुटूर२८० ते ३२०२२० ते २५०
चपाटा४५० ते ५००२५० ते २७५
ब्याडगी४५० ते ५००३२५ ते ३५०
काश्मिरी६५० ते ६८०४५० ते ४७५

हेही वाचा : Jute Farming : बाजारात तागाला अधिक मागणी असल्याने शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे ताग शेती

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीभाज्यामार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमराठवाडा