Join us

शेवग्याचे भाव वधारले; राज्यातील अनेक आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:29 IST

Vegetable Market Rate : राज्यातील अनेक आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात शेवग्याने ७० रुपयांपर्यंत मजल मारली असून टोमॅटो, दोडक्यासह सर्वच भाजीपाला भाव खाऊन जात असल्याचे दिसून येत आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील मंगळवारच्या आठवडी बाजार तसेच राज्यातील इतर काही बाजारात देखील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात शेवग्याने ७० रुपयांपर्यंत मजल मारली असून टोमॅटो, दोडक्यासह सर्वच भाजीपाला भाव खाऊन जात असल्याचे दिसून येत आहे.

लाखनी येथील आठवडी बाजारात गुरुपौर्णिमेसाठी परिसरातील अनेक व्यापारी आणि ग्राहकांसह शेतकऱ्यांनी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सध्या शेतकरी आंतरमशागत आणि खरीप हंगामाच्या रोवणी कामात व्यस्त आहेत.

त्यामुळे येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून, भाजीपाल्याच्या दराने मोठ्या प्रमाणात उच्चांकी गाठली. भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरीही उत्पादन कमी झाल्याने परवडत नाही. सध्या लाखनी तालुक्यात दमदार पावसामुळे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील शेवगा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/07/2025
श्रीरामपूर---क्विंटल6500060005500
अकलुजलोकलक्विंटल6300055004000
पुणे- खडकीलोकलक्विंटल1400040004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल63400070005500
09/07/2025
धाराशिव---क्विंटल8400060005000
पुणे-मांजरी---क्विंटल3400060005000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21300090006000
खेड-चाकण---क्विंटल25500070006000
श्रीरामपूर---क्विंटल12400060005000
भुसावळ---क्विंटल1550055005500
सातारा---क्विंटल9400050004500
राहता---क्विंटल3550080006000
नाशिकहायब्रीडक्विंटल17400050004500
कल्याणहायब्रीडक्विंटल3600070006500
अकलुजलोकलक्विंटल5300050004500
जळगावलोकलक्विंटल20500060005500
पुणे- खडकीलोकलक्विंटल1300030003000
मुंबईलोकलक्विंटल418500060005500
बारामती-जळोचीनं. १क्विंटल16300060005000

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :भाज्याशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीविदर्भपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती