Join us
Daily Top 2Weekly Top 5

मागील आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात तीन हजाराने वाढ; वाचा कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:47 IST

dalimb market solapur श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर येथे बुधवारी ४१ क्विंटल डाळिंबाची आवक झाली होती.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी ४१ क्विंटल डाळिंबाची आवक झाली होती.

मागील आठवड्यात डाळिंबाला सरासरी दर ९००० रुपये क्विंटल इतका मिळत होता.

त्यात वाढ होऊन बुधवारी हा दर १२ हजार रुपये इतका राहिला. त्यामुळे डाळिंबाच्या दरात तीन हजार रुपयाने वाढ झाली आहे.

चांगल्या प्रतीच्या मालाला प्रतिक्विंटल २३५०० रुपये इतका दर मिळाला आहे.

सांगोला, करमाळा, माढा, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ आदी भागातून आवक होत आहे.

अधिक वाचा: कर्जमाफीसाठी पुढील हलचाली सुरु; राज्य शासनाने बँकांकडून शेतकऱ्यांची 'ही' माहिती मागविली

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate prices surge by ₹3,000 compared to last week.

Web Summary : Pomegranate prices soared by ₹3,000 this week in Solapur market. Arrivals totaled 41 quintals, with average prices reaching ₹12,000 per quintal, up from ₹9,000 last week. Top-quality pomegranates fetched ₹23,500 per quintal, sourced from Sangola, Karmala, and other regions.
टॅग्स :डाळिंबसोलापूरबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीफळेशेतकरी