Join us
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' महत्वाच्या बाजारात सुरू होणार खुली कांदा खरेदी; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:32 IST

kadna khula lilav सध्या कांद्याची काढणी सुरू असून योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी जागेवरच माल विक्री करीत आहेत.

नेवासा : नेवासा बाजार समितीत ६ मेपासून खुली कांदा खरेदी-विक्री केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेवासा बाजार समितीत आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी व गुरुवारी खुल्या कांदा लिलावाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केले.

घोडेगाव येथील कांदा गोणी मार्केटला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथेही खुल्या कांदा खरेदी-विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी खुल्या लिलावासाठी नेवासा बाजार समितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कांद्याची काढणी सुरू असून योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी जागेवरच माल विक्री करीत आहेत.

नेवासा, भालगाव, गोधेगाव, प्रवरासंगम, सलाबतपूर, जळके, वरखेड, रामडोह, गोगलगाव, गळनिंब, मुरमे, सुरेगाव गंगा, सुरेगाव दही, देडगाव, पाचेगाव, पुनतगाव, खुपटी, बेलपिंपळगाव, बेलपांढरी यांसह नेवासा बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) व महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते व बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

अधिक वाचा: एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या लाईट बिलात अजून १५ टक्के सवलत; वाचा कुणाला मिळणार लाभ?

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतकरीशेतीअहिल्यानगरनेवासापुणे कृषी उत्पन्न बाजार समिती