नेवासा : बाजार समितीत बुधवारी (दि.६) खुला कांदाबाजार सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी विक्रमी ३१५ वाहनांची आवक झाल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
कांद्याला प्रतिक्विंटल १,१३० रुपयांपर्यंत भाव मिळाला. नेवासा बाजार समितीचा खुला कांदा खरेदीचा निर्णय शेतकरी हिताचा असल्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
महंत उद्धव महाराज मंडलिक, वेदांतचार्य देवीदास महाराज म्हस्के यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सभापती नंदकुमार पाटील यांनी केले.
महंत देवीदास महाराज म्हस्के यांनी नेवासा बाजार समितीने टाकलेले हे प्रेरणादायी पाऊल असल्याचे सांगितले.
महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी या निर्णयामुळे नेवासा शहर व परिसराच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे सांगितले.
गडाख म्हणाले, की २४ वर्षांपूर्वी घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू केले, आज घोडेगाव मार्केटचा राज्यात क्रमांक लागतो. आता नेवासा शहरात खुला कांदा बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
खुला कांदा बाजार सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मुलांना कांदा व्यापारी म्हणून संधी दिल्याने रास्त भाव मिळेल, असे ते म्हणाले.
अधिक वाचा: हवामानात मोठा बदल; राज्यात 'या' ठिकाणी ९ ते ११ मे दरम्यान पुन्हा गारपिटीसह पावसाची शक्यता
Web Summary : Nevasa Market Committee launched open onion purchases, drawing a strong response. The first day saw 315 vehicles arrive, with prices reaching ₹1,130 per quintal. Former Minister Gadakh hailed the move as beneficial for farmers, providing a vital market for their produce and boosting the local economy.
Web Summary : नेवासा बाजार समिति ने खुली प्याज खरीद शुरू की, जिससे अच्छी प्रतिक्रिया मिली। पहले दिन 315 वाहन आए, और कीमतें ₹1,130 प्रति क्विंटल तक पहुंचीं। पूर्व मंत्री गडाख ने इस कदम को किसानों के लिए फायदेमंद बताया, जिससे उन्हें अपनी उपज के लिए एक महत्वपूर्ण बाजार मिला और स्थानीय अर्थव्यवस्था को बढ़ावा मिला।