चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये डांगर भोपळा, लसूण, बटाटा, भेंडी व वाटाण्याचे भाव तेजीत राहिले.
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात शेपू, कोथिंबीर, मेथी व पालक भाजीची मोठी आवक होऊनही त्यांचे भाव कडाडले आहेत.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात टोमॅटो, गाजर, कारली, रताळी, वांगी, फ्लॉवर, कोबी, काकडी, भोपळा, शेवगा व गवार यांची उच्चांकी आवक झाली. एकूण उलाढाल ४ कोटी ९० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण १,५०० क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही भावात २०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भात १,३०० रुपयांवरून १,५०० रुपयांवर पोहोचला.
बटाट्याची एकूण आवक १,४०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक ६०० क्विंटलने घटली, तरीही भावात २०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव २,२०० रुपयांवरून २,००० रुपये स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १० क्विंटलने वाढल्याने लसणाचा कमाल भाव ८,००० रुपयांवरून १०,००० रुपयांवर पोहोचला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल होती. हिरव्या मिरचीला ३,००० रुपयांपासून ते ४,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - १,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) १,५०० रुपये.भाव क्रमांक २) १,००० रुपये.भाव क्रमांक ३) ७०० रुपये.
बटाटाएकूण आवक - १,४०० क्विंटल.भाव क्रमांक १) २,००० रुपये.भाव क्रमांक २) १,५०० रुपये.भाव क्रमांक ३) १,००० रुपये.
अधिक वाचा: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवा झाला स्वस्त; वाचा कोणत्या सुक्यामेव्याला मिळतोय किती दर?
Web Summary : Chakan market sees increased onion prices, reaching ₹1,500/quintal. Other vegetables like pumpkin, garlic, and peas also show strong prices. While potato prices decreased slightly despite lower supply. The total turnover was ₹4.9 crore.
Web Summary : चाकण बाजार में प्याज की कीमतों में वृद्धि देखी गई, जो ₹1,500/क्विंटल तक पहुंच गई। कद्दू, लहसुन और मटर जैसी अन्य सब्जियों की कीमतों में भी तेजी आई। आपूर्ति कम होने के बावजूद आलू की कीमतों में थोड़ी गिरावट आई। कुल कारोबार ₹4.9 करोड़ रहा।