lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > कांदा बाजारभाव: बाजारसमितीच्या संपानंतर लासलगावमध्ये कांदा बाजारभाव वाढले की घटले?

कांदा बाजारभाव: बाजारसमितीच्या संपानंतर लासलगावमध्ये कांदा बाजारभाव वाढले की घटले?

Onion market rates: today's onion market rates in Lasalgaon, Pimpalgaon, Nashik, Pune, Solapur | कांदा बाजारभाव: बाजारसमितीच्या संपानंतर लासलगावमध्ये कांदा बाजारभाव वाढले की घटले?

कांदा बाजारभाव: बाजारसमितीच्या संपानंतर लासलगावमध्ये कांदा बाजारभाव वाढले की घटले?

रविवारची सुटी आणि सोमवारचा संप यामुळे लासलगावसह प्रमुख बाजारात कांदा लिलाव बंद होते. त्यानंतर आज मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कांदा लिलाव सुरू झाले असून कांदा बाजारभाव (onion market rates) वाढला की घटला ते जाणून घेऊ यात.

रविवारची सुटी आणि सोमवारचा संप यामुळे लासलगावसह प्रमुख बाजारात कांदा लिलाव बंद होते. त्यानंतर आज मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कांदा लिलाव सुरू झाले असून कांदा बाजारभाव (onion market rates) वाढला की घटला ते जाणून घेऊ यात.

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या दोन आठवड्यापासून राज्यातील दररोजच्या कांदा आवकेत सरासरी दहा टक्क्यांनी घट होताना दिसत आहे. उन्हाळी कांदाबाजारात यायला अजून अवकाश असल्याने आणि ग्राहकांकडून मागणीही वाढत असल्याने या संपूर्ण आठवड्यात कांद्याचे बाजार स्थिरावलेले दिसून आले. दरम्यान काल राज्यातील अनेक बाजारसमित्यांनी सामुहिकरित्या बंद आंदोलन केले होते. त्यानंतर आज सकाळी बाजारात आलेल्या कांद्याच्या बाजारभावांमध्ये लासलगाव व विंचूर बाजारसमितीत १०० ते २०० रुपयांनी घसरण दिसून आली.

शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी आणि त्यानंतर सोमवारी झालेला संप, अशा दोन दिवसांच्या खंडानंतर आज सकाळी लासगलगाव बाजारसमितीत सकाळच्या सत्रात झालेल्या कांदा लिलावांना सरासरी १६५० रुपये बाजारभाव (onion market rates) मिळाला.

सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत ९ हजार ३५०, तर शेजारी असलेल्या विंचूर उपबाजार समितीत १२ हजार ५०० क्विंटल कांदा आवक झाली. विंचूर बाजारसमितीत कांद्याला सरासरी १७५१ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

दरम्यान राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---8707170023002000
खेड-चाकण---350160020001800
लासलगावलाल935060018411650

लासलगाव -

विंचूर

लाल1250075019011751
मनमाडलाल500050017811500

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल516640023001350
पुणेलोकल2626470021001400
पुणे- खडकीलोकल1680014001100
पुणे -पिंपरीलोकल6200020002000

Web Title: Onion market rates: today's onion market rates in Lasalgaon, Pimpalgaon, Nashik, Pune, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.