मागील दोन महिन्यांपासून तेजीत असणाऱ्या कांद्याचा दर उतरला आहे. त्याचबरोबर आता लसणाचाही भाव कोसळलाय. तर भाजीपाल्याची आवक कायम असून दर स्थिर आहे. त्याचबरोबर बाजारात सध्या उन्हाळी फळांची आवक वाढत आहे.
सातारा बाजार समितीत शुक्रवार वगळता दररोज भाजीपाल्याची आवक होत असते. जिल्ह्यातून तसेच अन्य राज्यातूनही शेतमाल येतो. या बाजार समितीतील माल नंतर दुकाने तसेच मंडईत विकला जातो. येथे सध्या भाज्यांचे दर स्थिर आहेत.
बाजार समितीत वांग्याला क्विंटलला २ ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. टोमॅटोला अजूनही दर कमीच आहे. क्विंटलला अवघा ६०० ते ८०० रुपये भाव येत आहे. फ्लॉवरला १ ते २ हजार, दोडक्याला २ ते अडीच हजार, कारल्याला क्विंटलला ३ ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे.
कांद्याला ५०० पासून दर
कांद्याचा भाव कमी झाला आहे. बाजार समितीत क्विंटलला ५०० पासून अडीच हजारापर्यंत भाव येत आहे. एक महिन्यापूर्वी क्विंटलला ५ हजारांपर्यंत भाव गेला होता. सध्या नवीन आवकला हळूहळू सुरुवात झाली आहे.
लसणाला ७ ते १० हजार दर
सातारा बाजारात सध्या लसणाचा भाव एकदमच खाली आलाय. बाजार समितीत क्विंटलला ७ ते १० हजार रुपये दर मिळतोय.
हेही वाचा : Success Story : मेहनतीला मिळाली बाजारभावाची साथ; विनायक यांची आंतरपिकांत जोरदार कमाल