चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, कोबी, फ्लॉवर व टोमॅटोची विक्रमी आवक घटली आहे. हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांचे भाव गडगडले आहेत.
कांद्याची आवक कमी होऊनही भाव स्थिर राहिले. चाकण बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव घसरले. एकूण उलाढाल ५ कोटी ४५ लाख रुपये झाली आहे.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ५ हजार क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४ हजार ५०० क्विंटलने कमी असूनही कांद्याचे कमाल भाव १,३०० रुपयांवर स्थिर राहिले आहेत.
बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने वाढली असूनही बटाट्याचा कमाल भाव १,२०० रुपयांवर स्थिर राहिला आहे.
लसणाची एकूण आवक ४० क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १० क्विंटलने कमी असूनही भावात २ हजार रुपयांची घट होऊन कमाल भाव १० हजार रुपयांवर आला आहे.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३६५ क्विंटल झाली आहे. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयांपासून ५,५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.
शेतमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - ५,००० क्विंटल.भाव क्रमांक १) १,३०० रुपये.भाव क्रमांक २) १,००० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.बटाटाएकूण आवक - १,२५० क्विंटल.भाव क्रमांक १) १,२०० रुपये.भाव क्रमांक २) १,००० रुपये.भाव क्रमांक ३) ८०० रुपये.
अधिक वाचा: रॉकेल विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ; प्रति लिटर आता किती मिळणार कमिशन?
Web Summary : Onion arrival decreased in Chakan market, but prices remained stable. Other vegetables like green chillies and potatoes saw fluctuating prices. Overall turnover reached ₹5.45 crore.
Web Summary : चाकण बाजार में प्याज की आवक कम हुई, लेकिन कीमतें स्थिर रहीं। हरी मिर्च और आलू जैसी अन्य सब्जियों की कीमतों में उतार-चढ़ाव देखा गया। कुल कारोबार 5.45 करोड़ रुपये रहा।