राज्यात गुढीपाडवा निमित्त अनेक बाजारात लिलाव बंद होते. तर आलेल्या आवकेच्या अनुषंगाने काही ठिकाणी आज शेतमाल लिलाव पार पडले. ज्यात आज रविवार (दि.३०) रोजी १९ क्विंटल गव्हाची आवक झाली होती. तर २६ क्विंटल तूर आवक बघावयास मिळाली.
तूर आणि गहूची आज झालेली पूर्ण आवक केवळ शेवगाव - भोदेगाव (जि. अहिल्यानगर) व परांडा (जि. धाराशिव) येथे दिसून आली. ज्यात २१८९, लोकल या वाणाचा गहू तर पांढऱ्या वाणाच्या तुरीचा समावेश होता.
गहू बाजारात आज शेवगाव - भोदेगाव येथे २१८९ वाणाच्या १० क्विंटल आवकेला २५५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर परांडा येथे लोकल वाणाच्या ९ क्विंटल आवकेला सरासरी २७२५ रुपये दर मिळाला.
तूर बाजारात पांढऱ्या वाणाच्या तुरीला २३ क्विंटल आवक असलेल्या शेवगाव - भोदेगाव येथे सरासरी ६८०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर परांडा येथे ३ क्विंटल आवकेस सरासरी ७००० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.
गेल्या आठवड्याचा विचार करता आवक कमी असल्याने काही अंशी आज दर वधारलेले दिसून आले. तर आर्थिक वर्ष मार्च अखेर आणि ईद सुट्टी या पार्श्वभूमीवर आगामी दोन दिवस आवक कमी राहण्याची शक्यता व्यापारी वर्गांकडून वर्तवली जात आहे.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गहू आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
30/03/2025 | ||||||
शेवगाव - भोदेगाव | २१८९ | क्विंटल | 10 | 2550 | 2550 | 2550 |
परांडा | लोकल | क्विंटल | 9 | 2725 | 2725 | 2725 |
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार तूर आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
30/03/2025 | ||||||
शेवगाव - भोदेगाव | पांढरा | क्विंटल | 23 | 6800 | 6900 | 6800 |
परांडा | पांढरा | क्विंटल | 3 | 7000 | 7000 | 7000 |