Lokmat Agro >बाजारहाट > मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या सफरचंदाची आवक; पेटीला कसा मिळाला दर?

मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या सफरचंदाची आवक; पेटीला कसा मिळाला दर?

New Zealand apples arrive in Mumbai market for the first time; How did the box get the price? | मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या सफरचंदाची आवक; पेटीला कसा मिळाला दर?

मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या सफरचंदाची आवक; पेटीला कसा मिळाला दर?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी न्यूझीलंडचे रुज सफरचंद दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईत दाखल झालेल्या या सफरचंदविषयी व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी न्यूझीलंडचे रुज सफरचंद दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईत दाखल झालेल्या या सफरचंदविषयी व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी न्यूझीलंडचे रुज सफरचंद दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईत दाखल झालेल्या या सफरचंदविषयी व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

फळांच्या बाजारात वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणून सफरचंदची ओळख आहे. सद्यःस्थितीमध्ये हिमाचलमधील सफरचंदचा हंगाम सुरू आहे.

२०० ते ३०० टन सफरचंद हिमाचलमधून मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहेत. सफरचंद शीतगृहात साठविता येत असल्यामुळे हंगाम संपल्यानंतरही ते ग्राहकांना उपलब्ध करून देता येतात.

बाजार समितीमध्ये गुरुवारी न्यूझीलंडमधील सफरचंद दाखल झाले. १७ किलोंच्या पेटीला चार हजार रुपये भाव मिळाल्याचे व्यापऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी अमेरिकेसह दक्षिण आफ्रिकेचे सफरचंदही भारतात येतात. आता त्यामध्ये न्यूझीलंडच्या रुज सफरचंदचा समावेश झाला आहे.

बाजार समितीमधील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी सांगितले की, न्यूझीलंडच्या उच्चायुक्तांच्या उपस्थितीमध्ये या व्यापारास सुरुवात करण्यात आली आहे.

अधिक वाचा: महसूल विभाग १७ ते २२ सप्टेंबरमध्ये शेतरस्त्यासाठी विशेष मोहीम राबवणार; जाणून घ्या सविस्तर

Web Title: New Zealand apples arrive in Mumbai market for the first time; How did the box get the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.