Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नवीन हरभऱ्याची बाजारात एंट्री; वाचा काय मिळतोय दर

नवीन हरभऱ्याची बाजारात एंट्री; वाचा काय मिळतोय दर

New gram enters the market; Read what is the price being offered | नवीन हरभऱ्याची बाजारात एंट्री; वाचा काय मिळतोय दर

नवीन हरभऱ्याची बाजारात एंट्री; वाचा काय मिळतोय दर

Market Update : हदगाव तालुक्यातील निवधा, कोळी, तळणी परिसरात रब्बी हंगामातील हरभरा काढणीची शेतकऱ्यांची कामे जोमात सुरू असून, काही शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून काढून बाजारपेठेत विक्रीकरिता आणले. नवीन हरभऱ्याला निवघा बाजारपेठेत खाजगी व्यापारी ५ हजार ४०१ रुपयांत खरेदी करीत आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या  हदगाव तालुक्यातील निवधा, कोळी, तळणी परिसरात रब्बी हंगामातील हरभरा काढणीची शेतकऱ्यांची कामे जोमात सुरू असून, काही शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून काढून बाजारपेठेत विक्रीकरिता आणले. नवीन हरभऱ्याला निवघा बाजारपेठेत खाजगी व्यापारी ५ हजार ४०१ रुपयांत खरेदी करीत आहेत.

रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या उत्पन्नात घट झाली असून, दरवर्षी एक एकरला आठ ते दहा क्विंटल उतारा येतो. यावर्षी मात्र सहा ते आठ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळत आहे. उत्पादनापेक्षा पेरणी खर्चच शेतकऱ्यांचा जास्त होत आहे.

बाजारपेठेत नवीन तूर दाखल झाली, तेव्हा खाजगी व्यापाऱ्यांनी ७ हजार ३०० रुपये दराने खरेदी केली; परंतु शेतकऱ्यांच्या घरात जसजसे तूर पीक येत आहे तसतसे रोजच्या रोज तुरीचे दर कमी होत आहेत.

सध्या बाजारपेठेत ६ हजार ३०० ते ६ हजार ८०० रुपयांपर्यंत तुरीला दर मिळत आहे. शेती मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने नाफेड केंद्रावर शेतकरी तुरीची विक्री करीत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : अधिक फायद्याचे म्हणून प्रचलित असणाऱ्या गांडूळ खताच्या वापरावर पण मर्यादा आहेत का? वाचा काय आहे प्रकरण

Web Title: New gram enters the market; Read what is the price being offered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.