नवी मुंबई : गणेशोत्सवामुळे मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ३ हजार टन फळांची व १ हजार २५२ टन नारळाची आवक झाली. नारळानंतर सफरचंदची सर्वाधिक ८७४ टन आवक झाली आहे.
उत्सवामुळे नारळाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गत आठवड्यात सरासरी ३०० ते ४०० टन नारळाची आवक होत होती. २२ ऑगस्टला सर्वाधिक ६०० टन आवक झाली होती.
होलसेल मार्केटमध्ये प्रतिनारळ ३० ते ३५ रुपयांना विकला जात होता. किरकोळ मार्केटमध्ये ४० ते ५० रुपयांना नारळ उपलब्ध होत होता. बाजार समितीमध्ये मंगळवारी एकाच दिवशी १२५२ टन आवक झाली आहे.
नारळाचे दर ३० ते ६३ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही ५० रुपयांच्या पुढे नारळ उपलब्ध होत आहे. नारळासोबत फळांनाही मागणी वाढली.
बाजार समितीमध्ये एकाच दिवसात ३ हजार टन फळांची आवक झाली. सर्वाधिक ८७४ टन सफरचंद, २६५ टन डाळिंब, ३५५ टन मोसंबी, २७३ टन पेरूसह अननस, चिकू, पपई, प्लम, संत्री, सीताफळ यांचीही आवक वाढली आहे.
अधिक वाचा: Ful Market : बाप्पांच्या स्वागताला फूलबाजार तेजीत; 'ह्या' फुलांना मिळतोय सर्वधिक दर?