अनिलकुमार मेहेत्रे
पाचोड : धुके आणि उन्हामुळे मृगबाहर मोसंबीवर (Mosambi) मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यावर काळे चट्टे पडत असल्याने चांगल्या दर्जाच्या मोसंबीच्या तुलनेत टनामागे या मोसंबीचा दर ८ हजार रुपयांनी घसरला आहे.
गुरुवारी पाचोड येथील बाजारात १०० ते १५० टन मोसंबीची (Mosambi) आवक होती. हिरव्या म्हणजे चांगल्या दर्जाच्या मोसंबीला प्रति टन १८ हजार तर काळे चट्टे पडलेल्या मोसंबीला १० हजार रुपयांचा दर मिळाला.
पैठण तालुक्यातील मोसंबी सातासमुद्रापार विक्रीसाठी गेलेली आहे. म्हणूनच पाचोडला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
दरवर्षी पाचोड आणि मृगबहार मोसंबी (Mosambi) विक्रीसाठी आणतात. येथील मोसंबी मार्केटमध्ये अनेक राज्यातील व्यापारी मोसंबी खरेदीसाठी येतात. सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका आणि धुके पडत असल्याने यंदा मृगबाहर मोसंबी बागावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
या रोगामुळे मोसंबीवर काळे चट्टे पडत असल्याने मोसंबीला मुंबई आणि दिल्ली येथील मार्केटमध्ये उठाव नाही. यामुळे या मोसंबीचे दर पाचोड येथील बाजारात गुरुवारी झालेल्या लिलावात चांगल्या दर्जाच्या मोसंबीच्या तुलनेत टनामागे ८ हजार रुपयांनी घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
हिरव्या म्हणजे चांगल्या दर्जाच्या मोसंबीला प्रति टन १८ हजार तर काळे चट्टे पडलेल्या मोसंबीला दहा हजार रुपयांचा दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याची भरपाई कशी करणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मंगू रोगाच्या प्रादुर्भावाचा परिणाम
धुके आणि उन्हामुळे मृगबहार मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला. ही बाब खरी आहे. या मोसंबीवर काळे चट्टे पडत असल्याने त्यांचा उठाव दिल्ली आणि मुंबई बाजारात होत नाही. चांगल्या दर्जाच्या मोसंबीच्या तुलनेत टनामागे या मोसंबीचा दर ८ हजार रुपयांनी घसरला आहे. गुरुवारी पाचोड येथील बाजारात १०० ते १५० टन मोसंबीची आवक होती. - शिवाजी भालसिंगे, मोसंबी व्यापारी, पाचोड
मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काटे चट्टे पडलेला हाच तो मोसंबी फळांचा ढीग.
१०० ते १५० टनाची मोसंबीची आवक पाचोड येथील बाजारात होती. गेल्या वर्षी मृगबहार मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही.
७० टक्के मोसंबी फळावर काळे चट्टे
* पाचोड येथील बाजारात गुरुवारी १०० ते १५० टन मोसंबीची आवक होती. गेल्या वर्षीं मृगबाहर मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. त्यामुळे मोसंबीला प्रति टन २० ते २८ हजारापर्यंत दर मिळाला होता.
* याशिवाय दिल्लीसह मुंबई बाजारातही या मोसंबीला मोठ्या प्रमाणात उठाव होता. यंदा मात्र ७० टक्क्यांपेक्षा जास्त मोसंबी बागावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला असून मोसंबी रंग काळपट झाला आहे.
हे ही वाचा सविस्तर: Kapus Kharedi: शेतकऱ्यांनो! कापूस नोंदणीची 'ही' आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर