Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी क्षेत्र असलेला जिल्हा अव्वल ठेवत राज्याच्या साेयाबीन खरेदी मर्यादेत तुटपुंजी वाढ

By सुनील चरपे | Updated: December 11, 2025 14:33 IST

एमएसपी दराने साेयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात साेयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत मात्र कमी सोयाबीन क्षेत्र असलेला 'हा' जिल्हा अव्वल स्थानी आहे.

एमएसपी दराने साेयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात साेयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत काेल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ही मर्यादा संपूर्ण राज्यभर एकच म्हणजेच हेक्टरी ३० क्विंटल (एकरी १२ क्विंटल) करणे गरजेचे आहे.

राज्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील साेयाबीनचे पेरणीक्षेत्र चार लाख हेक्टरपेक्षा अधिक असून, बुलढाणा, बीडचे तीन लाखांच्या वर, परभणी, हिंगाेली, अकाेला, वाशिम, अमरावती, यवतमाळचे दाेन लाखांच्या वर, अहिल्यानगर, जालना, वर्धा व नागपूर जिल्ह्यांचे एक लाखाच्या वर, तर उर्वरित १२ जिल्ह्यांमधील साेयाबीनचे पेरणीचे पेरणीक्षेत्र एक लाखापेक्षा कमी आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून साेयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहेत.

राज्य सरकारच्या कृषी विभागाने काढलेल्या साेयाबीन उत्पादकतेच्याही मर्यादा ठरविण्यात आली असून, पहिली मर्यादा १५ नाेव्हेंबरला जाहीर करण्यात आली. ती मर्यादा फारच कमी असल्याने त्यावर आक्षेप नाेंदविण्यात आले. हिवाळी अधिवेशनात सरकारची गाेची हाेऊ नये म्हणून त्या मर्यादेत सुधारणा करून ९ डिसेंबरला नवीन मर्यादा जाहीर केली.

ती मर्यादादेखील अन्यायकारक असल्याने सरकारने जिल्हानिहाय मर्यादा अट रद्द करून सरसकट एकरी १२ क्विंटलप्रमाणे साेयाबीनची राज्यभर खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

साेयाबीन खरेदी मर्यादा (क्विंटल/प्रतिएकर)

जिल्हा जुनी मर्यादा  वाढीव मर्यादाजिल्हाजुनी मर्यादावाढीव मर्यादाजिल्हाजुनी मर्यादावाढीव मर्यादा
१) नाशिक६.०० ११.०६१०) कोल्हापूर९.८० १७.३१ १९) बुलढाणा ६.०४ ७.६२ 
२) धुळे ६.६० ८.४४ ११) छ. संभाजीनगर४.६८ ८.५३ २०) अकोला ५.८० ७.०६ 
३) नंदुरबार४.९९ ५.९६ १२) जालना ६.०० ६.४३ २१) वाशिम ८.१६ ९.१८ 
४) जळगाव६.८० १०.८० १३) बीड ७.०० १०.३० २२) अमरावती ६.८४ ८.४२ 
५) अहिल्यानगर ५.८० १३.३० १४) लातूर ८.०४ ११.०१ २३) यवतमाळ५.७२ ६.५२ 
६) पुणे ९.४० १४.६० १५) धाराशिव ६.८० ९.३० २४) वर्धा ६.२० ८.५३ 
७) सोलापूर६.०० ८.४४ १६) नांदेड५.४० ७.७१ २५) भंडारा४.३० ५.८९ 
८) सातारा ८.८० १२.४५ १७) परभणी ५.३२ ८.०८ २६) नागपूर३.०० ५.६१ 
९) सांगली९.३४ १५.३६ १८) हिंगोली५.६० ७.३५ २७) चंद्रपूर६.०० ६.९१ 

खरेदीत उत्पादकतेचा अडसर

• साेयाबीन विक्री नाेंदणी, खरेदीला विलंब व उत्पादकतेनुसार खरेदी मर्यादा ही संपूर्ण प्रक्रिया विचारात घेता, सरकारला शेतकऱ्यांकडील साेयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट हाेते.

• त्यासाठी खरेदीत उत्पादकतेचा अडसर निर्माण केला जात असल्याने कृषी विभागाने आधी कमी आणि नंतर वाढीव उत्पादकता जाहीर केली, असे मत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद दामले यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा : सीसीआयने कापूस खरेदी मर्यादा वाढविली; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात प्रतिएकर किती कापूस खरेदी होणार

English
हिंदी सारांश
Web Title : Limited Soybean Purchase Increase Sparks Farmer Discontent; Kolhapur Tops List

Web Summary : Maharashtra's meager increase in MSP soybean purchase limits favors some districts over major producers. Farmers demand a uniform state-wide limit, criticizing district-wise disparities as unfair and hindering sales. Kolhapur receives the highest limit, causing widespread discontent. Farmers allege the government is unwilling to buy soybean at MSP rates.
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरीमराठवाडाविदर्भ