यंदाच्या हंगामात २५ ते ३० टक्क्यांच्या मर्यादेत आंबिया बहराची फळे शिल्लक आहेत. सुरुवातीला काढलेली अल्प प्रमाणातील फूट, अतिउष्णतेमुळे झालेली संत्रा फळगळ, पावसाळ्यात गळालेली फळे यामुळे आंबिया बहराच्या संत्रा फळांना प्रतिहजार चार-पाच हजार रुपये विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे.
सध्या उच्च प्रतीच्या दर्जेदार संत्राबागा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ लागल्याची चिन्हे असल्याने विक्रमी भाव मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे अमरावती, वरूड, मोर्शी, अचलपूर येथीलच नाही तर सौंसर (मध्य प्रदेश), गाझियाबाद (उत्तर प्रदेश), राजस्थान येथील व्यापारी संत्राबागा खरेदी करण्यासाठी येत आहेत.
वाढत्या दराने खरेदी होत असल्याने संत्रा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तथापि, संपूर्ण संत्रापट्टयात एक तृतीयांश संत्राच झाडाला असल्याने वाढत्या भावांचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नसल्याचे बोलले जात आहे.
परिणामी सुरुवातीच्या काळात बाजारपेठेत आवक कमी राहून भावात तेजी येण्याची शक्यता आहे. यंदा मृग बहरातील संत्र्याचे दर ५५ हजार रुपये टनावर पोहोचले होते. सप्टेंबरमध्ये बाजारात उच्च प्रतीच्या फळांना ६० रुपये प्रतिकिलो दर मिळण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
विमा ट्रिगर कालावधी वाढविण्याची मागणी
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अवेळी पाऊस, कमी -जास्त तापमान, गारपीट विमा सीमित न ठेवता ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाढविण्यात शेतकऱ्यांचे हित आहे. संत्रा हे वार्षिक पीक असल्याने विमा कवच हे संपूर्ण वर्षभर असायला पाहिजे. वेगवान वाऱ्यामुळे संत्र्याचे नुकसान होत असल्याने याचा समावेश विमा योजनेत करावा, अशी मागणी होत आहे.
कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या दोन दिवसांतील राज्यातील संत्री आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
27/07/2025 | ||||||
पुणे | लोकल | क्विंटल | 156 | 3000 | 7000 | 5000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 7 | 7000 | 7000 | 7000 |
26/07/2025 | ||||||
अहिल्यानगर | --- | क्विंटल | 6 | 3000 | 9000 | 6000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 4 | 7000 | 7000 | 7000 |
हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर