Join us

महिनाभर आधीच बागांमधील आंबा यंदा संपला; आर्थिक गणिते विस्कटत आंबा हंगामाची अखेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:25 IST

Mango Market : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला असून, यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा बागायतदारांचे पेटीमागे सरासरी ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला असून, यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा बागायतदारांचे पेटीमागे सरासरी ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. आता बागायतदारांकडे आंबाच शिल्लक नसून, केवळ देणी भागवण्याचे प्रश्नचिन्ह शिल्लक आहे.

यावर्षी एकूणच आंबा हंगाम कमी होता. प्रत्यक्ष हंगाम दि. १ एप्रिल ते दि. १० मे असाच राहिला. दरवर्षी दि. ५ मेपासून दि. ५ जूनपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील आंबा असतो. मात्र यावर्षी पहिल्या टप्प्यातील म्हणजे मार्चमध्ये अवघा पाच टक्केच आंबा किरकोळ बागायतदारांकडे होता. दुसऱ्या टप्प्यात आंबा होता.

परंतु, त्याचे प्रमाणही कमी होते. तिसऱ्या टप्प्यात मात्र कुठल्याच बागायतदाराकडे आंबा उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे एक महिन्यातील आंबा हंगाम नसल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. दरवर्षी २० एप्रिलपर्यंत बाजारभाव टिकून राहतात, मात्र यावर्षी आधीच दर गडगडले. त्यामुळे एकूण पेटीचा खर्च व मिळणारा दर यामध्ये पेटीमागे बागायतदारांचे ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

यावर्षी पीक अवघे २५ ते ३० टक्के इतकेच होते. दि. ७ मेपासून सलग तीन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने आंबा मोठ्या प्रमाणावर कोसळला त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबासुद्धा बागायतदारांच्या हातातून निसटल्याने नुकसान झाले आहे. हवामानातील बदलामुळे झालेले नुकसान फळपीक विमा कंपन्यांनी ग्राह्य धरून बागायतदारांना भरपाई देणे आवश्यक आहे.

सध्या बागायतदारांकडे आंबाच नसल्याने काम संपले आहे. जो व्यवसाय झाला, त्यातून आर्थिक गणिते विस्कटली असून, बँकांच्या कर्जाची परतफेड, मजुरांचे पगार, फवारणी खर्च, खते, कीटकनाशकांची बिले भागवणे अवघड बनले आहे. दरवर्षी दर कमी असला तरी आंबा उशिरापर्यंत असतो. यंदा आंबाच संपून गेला आहे

एका पेटीला किमान २५०० ते ३००० रुपये खर्च येतो. मात्र प्रत्यक्ष पेटीला मिळणारा दर कमी असल्याने उत्पन्नापेक्षा खर्ची अधिक, शिवाय दरही कमी असल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून येऊ शकत नाही. - राजन कदम, बागायतदार.

एका पेटीला येणारा खर्च

लाकडी खोका - १२० रुपयेकीटकनाशके - ७०० रुपयेसाफसफाई - ७०० रुपयेबाग संरक्षण गुरखा खर्च - २०० रुपयेवाहतूक खर्च - २०० रुपयेफवारणी पेट्रोल खर्च - १०० रुपयेकाढणीसाठी मजुरी - २०० रुपये

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

टॅग्स :बाजारआंबाआंबामार्केट यार्डशेतकरीशेतीशेती क्षेत्ररत्नागिरी