साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला अजून दोन महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच आंध्र प्रदेश, केरळसह इतर भागांतून केशर, दसेरी, बदाम आंब्यांची आवक सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील बाजारात सुरू झाली असून, २०० रुपये किलोने ते मिळत आहेत.
पवित्र रमजान महिन्यानिमित्त गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांची आंब्याच्या दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मे महिन्यात गुजरातचा हापूस, केशर, मराठवाड्यातील केशर आणि गावरान आंब्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दोन महिन्यानंतर सर्वच आंब्यांची चव चाखायला मिळणार आहे.
सध्या उपलब्ध असलेले आंबे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेत. आंध्र प्रदेशातील लालबागचा आंबा इतर आंब्यांच्या मानाने चवीला गोड आणि सुगंधाला चांगला आहे. हा आंबा डझनावर नाही, तर किलोवर विकला जातो. ग्राहक सर्वाधिक गावरान आंब्याला पसंती देत असल्याचे दिसून येते.
मे महिन्यामध्ये दर घसरण्याची शक्यता
• यंदा पवित्र रमजान महिन्यानिमित्त बाजारात लालबाग, केशर, दसेरी, बदाम या जातीचे आंबे दाखल झाले आहेत.
• मात्र, त्यांच्या भावात वाढ झाली असून, सर्वसामान्य ग्राहकांकडून खरेदीसाठी फारसा प्रतिसाद मिळत नाही.
• सध्या आंब्यांची २०० रुपये किलोने विक्री होत आहे.
• मे महिन्यामध्ये आंब्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे फळ विक्रेत्याने सांगितले.
गेल्या दोन दिवसांत राज्याच्या बाजारात आवक झालेला आंबा व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
13/03/2025 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 22 | 11000 | 18000 | 14500 |
मुंबई - फ्रुट मार्केट | हापूस | क्विंटल | 1235 | 35000 | 80000 | 57500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 10 | 10000 | 30000 | 20000 |
मुंबई - फ्रुट मार्केट | लोकल | क्विंटल | 8445 | 15000 | 25000 | 20000 |
कामठी | लोकल | क्विंटल | 1 | 4500 | 5500 | 5000 |
12/03/2025 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 30 | 10000 | 18000 | 14000 |
सोलापूर | हापूस | नग | 9 | 4500 | 8800 | 7000 |
सांगली -फळे भाजीपाला | हापूस | क्विंटल | 44 | 20000 | 60000 | 40000 |
मुंबई - फ्रुट मार्केट | हापूस | क्विंटल | 1144 | 30000 | 80000 | 55000 |
सोलापूर | लोकल | नग | 21 | 2500 | 3500 | 3000 |
मुंबई - फ्रुट मार्केट | लोकल | क्विंटल | 1945 | 15000 | 25000 | 20000 |
कामठी | लोकल | क्विंटल | 1 | 4500 | 5500 | 5000 |
सौजन्य : कृषी पणन महामंडळ महाराष्ट्र राज्य.
हेही वाचा : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले; दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबू दर तेजीत