Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात चटणी करताय? मसाल्यांच्या दरात भरमसाठ वाढ, वाचा कोणत्या मसाल्याला काय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:01 IST

spices market price गेल्या महिनाभरात मसाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः लवंग, काळीमिरी आणि दालचिनीचे दर जास्त वाढले आहेत.

स्वयंपाकघरातील चवीचा गाभा असलेल्या खडा आणि गरम मसाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जिरे, धने यांसारख्या मसाला पिकांना अतिपावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटले.

काही मसाल्यांच्या जागतिक पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने बाजारात टंचाई निर्माण झाली. दरम्यान, लग्नसराई, सणवार आणि रमजान महिन्यामुळे मसाल्यांची मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात दर झपाट्याने वाढले आहेत.

स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते अनेक मसाल्यांच्या दरात गेल्या महिन्याभरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली, विशेषतः लवंग, काळीमिरी, दालचिनी, दगडफूल यांसारख्या मसाल्यांचे दर जास्त वाढले आहेत.

किरकोळ बाजारात दगडफूल, लवंग, दालचिनी, काळीमिरी, तमालपत्र, जायपत्री, जावित्री, वेलदोडा यांसारख्या मसाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. काही मसाले आयातीत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवड्याचा परिणाम स्थानिक बाजारावरही दिसून येत आहे.

मसाल्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. तसेच हॉटेलमध्ये अनेक पदार्थाचे दर वाढले आहेत.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबांमध्ये आता बाजारातील रेडिमेड किंवा पॅकिंग मसाल्यांचा वापर वाढला आहे. विविध कंपन्यांचे तयार मसाले सहज उपलब्ध असल्याने ग्राहक त्याकडे वळताना दिसत आहेत.

गेल्या महिनाभरात मसाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः लवंग, काळीमिरी आणि दालचिनीचे दर जास्त वाढले आहेत. लग्नसराई आणि रमजानमुळे मागणी वाढल्याने बाजारात तेजी आहे.

अशी झाली भावात वाढ (प्रतिकिलो दर)मसाला - पदार्थ सध्याचे भाव - मागील वर्षीचा भावजिरे - ३५० - ३००खसखस - २००० - १७००मिरची - २७० - २४०लवंग - ९०० - ७००मिरे - २०० ७००विलायची - ३००० - २७००ओवा - २४० - २००धना कट्टा - १४० - १२०दगडफूल - ८५० - ८००

उत्पादन घटण्यामागील ही आहेत कारणे◼️ लागवडीच्या काळात अतिपावसामुळे जिरे व धण्याचे मोठे नुकसान.◼️ काही भागांत कीड-रोगांचा प्रादुर्भाव.◼️ मसाला पिकांचे क्षेत्र कमी झाले.◼️ आयात होणाऱ्या मसाल्यांच्या पुरवठ्यात अडथळे.

अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Spice Prices Soar in Summer; Check the Latest Rates Here

Web Summary : Spice prices are skyrocketing due to crop damage and global supply issues. Demand is up due to weddings and Ramadan. Prices of cloves, black pepper, and cinnamon have increased significantly, impacting household budgets. Ready-made spice mixes are gaining popularity.
टॅग्स :मार्केट यार्डबाजारमिरचीपाऊसहॉटेललग्नलागवड, मशागत