आज कापसाचे दरही हमीभावापेक्षा कमीच होते. राज्यभरातील केवळ एका बाजार समितीमध्ये बाजारदरापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी दोन वर्षांपासून साठवून ठेवलेला कापूस मातीमोल दराने विक्री करावा लागत आहे. आज शिवजयंतीमुळे अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ६ बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव पार पडले.
दरम्यान, आज लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. सावनेर, समुद्रपूर, मौदा, वरोरा-खांबाडा, पुलगाव, सिंदी - सेलू बाजार समितीमध्ये कापसाचे लिलाव पार पडले. तर मौदा बाजार समिती वगळता सर्वच बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची आवक झाली होती. तर मौदा बाजार समितीमध्ये केवळ १७० क्विंटल कापसाची आवक झाली होती. आजचा उच्चांकी सरासरी दर हा सिंदी-सेलू बाजार समितीमध्ये ७ हजार १५० रूपये प्रतक्विंटल एवढा मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये १ हजार ६०० क्विंटल कापसाची आवक झाली होती.
आज वरोरा-खांबाडा आणि समुद्रपूर या बाजार समितीमध्ये निच्चांकी सरासरी दर मिळाला असून येथे ६ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर होता. येथे अनुक्रमे १ हजार २०० आणि १ हजार ४७१ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर आजच्या दिवसात ७ हजार ३७० रूपये प्रतिक्विंटल हा कमाल दर होता. आज ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळाला आहे.
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
19/02/2024 | ||||||
सावनेर | --- | क्विंटल | 3500 | 6775 | 6825 | 6800 |
समुद्रपूर | --- | क्विंटल | 1471 | 6200 | 7200 | 6700 |
मौदा | --- | क्विंटल | 170 | 6630 | 6830 | 6715 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 1200 | 6000 | 7170 | 6700 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1400 | 6200 | 7200 | 6750 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1600 | 6400 | 7370 | 7150 |