Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > कापसाचे दर हमीभावापेक्षा २ हजाराने कमी! जाणून घ्या आजचे सविस्तर दर

कापसाचे दर हमीभावापेक्षा २ हजाराने कमी! जाणून घ्या आजचे सविस्तर दर

maharashtra agriculture farmer cotton market yard rate less than msp 2 thousand | कापसाचे दर हमीभावापेक्षा २ हजाराने कमी! जाणून घ्या आजचे सविस्तर दर

कापसाचे दर हमीभावापेक्षा २ हजाराने कमी! जाणून घ्या आजचे सविस्तर दर

राज्यभरातले आजचे दर जाणून घ्या

राज्यभरातले आजचे दर जाणून घ्या

मागच्या एका महिन्यापासून सतत कापसाचे दर उतरत असून त्यामध्ये आता जास्तच घसरण झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. पण आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार एका बाजार समितीमध्ये तब्बल २ हजार रूपये कमी सरासरी दर कापसाला मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

दरम्यान, आज मध्यम स्टेपल, लांब स्टेपल,लोकल, ए.के.एच. -४- लांब स्टेपल या कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये हिंगणघाट येथे सर्वांधिक १० हजार ५०६ क्विंटल कापूस आवक झाला. तर बारामती बाजार समितीत कापसाला केवळ ५ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. बारामतीमध्ये केवळ ३ हजार रूपये प्रतिक्विंटल किमान दर मिळाला तर ६ हजार ३०० रूपये कमाल दर मिळाला आहे. 

अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक कापसाचा दर होता. येथे ७ हजार १२२ रूपये प्रतिक्विंटल तर त्यापाठोपाठ अकोला बाजार समितीमध्ये ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. आजच्या ए.के.एच. -४- लांब स्टेपल कापसाला आष्टी वर्धा बाजार समितीमध्ये ६ हजार ६५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. बारामती येथे मिळालेला दर हा हमीभावापेक्षा तब्बल २ हजार रूपये प्रतिक्विंटलने कमी आहे.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2024
सावनेर---क्विंटल3500675067506750
राळेगाव---क्विंटल6100650069206850
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल326600068006650
अकोलालोकलक्विंटल140685072307020
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल98699572507122
उमरेडलोकलक्विंटल928650069006700
नेर परसोपंतलोकलक्विंटल59610061006100
काटोललोकलक्विंटल242640068006700
हिंगणालोकलक्विंटल28670068006800
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1610655070406850
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल9300063005000
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10506600071606500
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2150655070206800

Web Title: maharashtra agriculture farmer cotton market yard rate less than msp 2 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.