जालना : उन्हाची चाहूल लागताच लिंबाची आवक कमी होऊन भावही (Limbu Bajar Bhav ) वाढतात. राजूर, टेंभुर्णी, जालना शहरांतील भाजी मार्केटमध्ये लिंबांची १५० ते २०० रुपये प्रतिकिलोने विक्री होत असून, एक लिंबू ५ ते १० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे सध्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
उन्हाळ्यात प्रत्येक घरात भरदुपारी किंवा पाहुण्यांना लिंबू-पाणी देण्याची परंपरा आहे. आता तापमानात वाढ हात असल्याने लिंबू सरबतही महाग झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (Limbu Bajar Bhav )
जालना जिल्ह्यात लिंबांची पाहिजे त्या प्रमाणात लागवड करण्यात आली नाही. त्यामुळे परजिल्ह्यांतून लिंबांची आवक (Limbu Arrivals) केली जाते. सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे लिंबांची आवक कमी होऊन दरात वाढ झाली आहे. हॉटेलमध्ये तर लिंबू मिळणे कठीण झाल्याचे दिसत आहे.
तापमान ३७ अंशांवर, रसवंतीगृहांवर गर्दी
* गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अनेकजण थंड पेयांची दुकाने पाहून थंड पेये आणि उसाच्या रसावर मनसोक्त ताव मारीत आहेत.
* सध्या जिल्ह्याचे तापमान ३७ अंशांवर आहे. त्यामुळे जालना-राजूर मार्गावरील रसवंतीगृहे हाऊसफुल्ल होत आहेत.
इतर जिल्ह्यातून लिंबांची आवक
* बागा कमी असल्याने व्यापारी दुसरीकडून लिंबू घेतात. त्यात वाहतूक खर्च येत असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत १० टक्के अधिक भाव असतो.
* उन्हाळा लागला की मोठ्या प्रमाणात फूलगळ होऊन उत्पन्न निघत नाही. परिणामी, पुरवठा कमी होतो आणि मागणीमध्ये वाढ होते. दरवर्षी उन्हाळ्यात आवक कमी होते. हिवाळा आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लिंबाची आवक असते. त्यावेळी कोणीही विचारत नाही. - वसंता अंभोरे, शेतकरी
नागरिक उन्हाळ्यात भाजीसह लिंबूपाणी घेण्यावर अधिक भर देतात. उन्हाळ्यात लिंबांचे उत्पादनही कमी होते. परिणामी, मागणी वाढते आणि भावात घट होते. सध्या आम्हालाही मोठ्या दराने लिंबू खरेदी करावे लागत आहेत. आगामी महिन्यात यात आणखी वाढ होईल. - अशोक गायकवाड, भाजीपाला विक्रेते
वाचा मार्केट यार्डातील लिंबाचे बाजारभाव
शेतमाल : लिंबू
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
23/03/2025 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 33 | 5000 | 6000 | 5500 |
राहता | --- | क्विंटल | 6 | 9000 | 12000 | 10500 |
पुणे | लोकल | क्विंटल | 529 | 500 | 5700 | 3100 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 30 | 10000 | 12000 | 11000 |
भुसावळ | लोकल | क्विंटल | 4 | 11000 | 12500 | 12500 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)
हे ही वाचा सविस्तर : Kesar Mango : गोड आंब्यांचं मराठवाड्यातील कोकण कोणतं? वाचा सविस्तर