Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पाच दिवसांत लिंबाच्या दरामध्ये २० ते ३० टक्क्यांची वाढ; वाचा एका गोणीस काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:21 IST

limbu bajar bhav आवक घटत असताना शहरातील सरबत विक्रेते, रसवंती गृहे आणि घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने घाऊक बाजारात लिंबाच्या भावात वाढ झाली असून दर तेजीत आहेत.

पुणे : उन्हाचा तडाखा वाढत असताना लिंबाचे दरही वाढत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने येत्या काही आठवड्यांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आवक घटत असताना शहरातील सरबत विक्रेते, रसवंती गृहे आणि घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने घाऊक बाजारात लिंबाच्या भावात वाढ झाली असून दर तेजीत आहेत.

अवघ्या पाच दिवसांत दरामध्ये २० ते ३० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी दिली. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दर्जानुसार एका गोणीस ५०० ते १२०० रुपये दर मिळत आहे.

आकारमानानुसार एका गोणीत ३०० ते ५५० लिंबे असतात. सध्या मार्केट यार्डात दररोज सुमारे एक ते दीड हजार गोणी लिंबाची आवक होत आहे.

राशीन परिसरासह अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातून मुख्यत्वे लिंबाची आवक होत आहे. कर्नाटकातील विजयनगर भागातूनही थोड्याफार प्रमाणात पुरवठा होत असला तरी त्याचे प्रमाण मर्यादित आहे.

उत्पादनावर परिणाम◼️ लिंबू उत्पादक पट्टयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.◼️ परिणामी, वाढत्या उन्हाळ्यासोबत आवक आणखी घटण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.◼️ किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.◼️ किरकोळ बाजारात एका लिंबासाठी सुमारे पाच रुपये मोजावे लागत आहेत.

उन्हाच्या चटक्यामुळे मागणी वाढली आहे. पुढील काळात भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळांपासून बचावासाठी लिंबूपाणी आणि सरबताची मागणी वाढली आहे. - रोहन जाधव, लिंबू व्यापारी, मार्केट यार्ड

अधिक वाचा: कर्जमाफी नक्की कशाच्या आधारावर दिली जाणार; शेतकऱ्यांची कोणकोणती माहिती घेतली जाणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Lemon prices surge 20-30% in five days due to heat.

Web Summary : Lemon prices in Pune have jumped 20-30% in just five days due to rising demand and reduced supply. Wholesale prices range from ₹500-₹1200 per bag. Water scarcity impacting production may further drive prices up, with retail lemons now costing ₹5 each.
टॅग्स :मार्केट यार्डबाजारशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेसोलापूरअहिल्यानगरकर्नाटक