नाशिक : एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत देशातून ८ लाख २३ हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली असून, देशाला १८०० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. मात्र, अपेडाच्या आकडेवारीनुसार गतवर्षीच्या तुलनेत २,२६८ कोटी रुपयांची निर्यात झाली होती.
यंदा निर्यातीमध्ये सुमारे २६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. झाल्याने शेतकरी, निर्यातदार दोघेही चिंतेत आहेत. स्थानिक बाजारात शेतमालाला मिळणारे अत्यल्प दर आणि निर्यातीत आलेली मंदी या दुहेरी संकटामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
कांदाकांदा निर्यात कमी उत्पादकांना आधीच बाजारात अतिशय कमी दर मिळत आहेत. त्यातच निर्यात घटल्याने त्यांचे उत्पन्न अधिकच कमी होण्याची भीती आहे. निर्यातदारांनी दीर्घकालीन धोरण लागू करण्याची मागणी केली आहे.
भारताकडून निर्यात झालेला कांदा (२०२५-२६) मे.टन.
एप्रिल - १३५४३० मेट्रिक टन
मे - १२८८९४ मेट्रिक टन
जून - ९८३६० मेट्रिक टन
जुलै - १०६७१६ मेट्रिक टन
ऑग. - १३१७८२ मेट्रिक टन
सप्टें. - १२३७१७ मेट्रिक टन
ऑक्टो. - ९८४७२ मेट्रिक टन
वारंवार निर्यातबंदीमुळे भारत देशाची विश्वासार्हता कमी झाली आहे. आपल्याकडे अचानक बंदी, अचानक शिथिलता यामुळे बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांनी पर्याय शोधले आहेत.
- विकास सिंह, उपाध्यक्ष, कांदा निर्यातदार संघटना
देशात कांद्याचे दर कमी झाले आहेत. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. निर्यातीच्या धरसोडवृत्तीमुळे निर्यात करण्यास अनेक अडचणी येतात. निर्यात धोरण स्थिर नाही.
- मनोज जैन, निर्यातदार, लासलगाव
