Join us

Weekly Kanda Market : मागील आठवड्यात कांद्याच्या आवकेत 35 टक्क्यांची वाढ, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:49 IST

Weekly Kanda Market : देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या मागील आवकमध्ये (kanda bajarbhav) आठवड्याच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Weekly Kanda Market : कांद्याची लासलगाव बाजारातील (Lasalgaon Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती २३९६ रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या आठवड्याच्या सुरवातीला कांदा बाजारभावात (Kanda Market) पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. 

देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या मागील आवकमध्ये आठवड्याच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील लासलगाव आठवड्यात बाजारात कांद्याच्या किंमती  २३९६ रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक होत्या. तर सोलापूर बाजारात (solapur Kanda Market) किंमती कांद्याच्या रु.२०६६ रुपये प्रति क्विंटल इतक्या होत्या. मागील सप्ताहातील कांद्याचे निवडक बाजारातील सरासरी किमती पाहिल्या असता लासलगाव बाजारात २३९६ रुपये सोलापूर बाजारात २०६६ रुपये, पिंपळगाव बाजारात २२७१ रुपये, अहिल्यानगर बाजारात २३५० रुपये, तर पुणे बाजार २३५० रुपये दर मिळाला.

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजनासोलापूर