Vegetable Market : खामगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. विशेषतः टोमॅटो, लिंबू, कांदा, पालक, मेथी आणि कोथिंबीर या पिकांची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली आहे.(Vegetable Market)
शहरातील भाजीबाजारात सध्या पालक, मेथी आणि कोथिंबीर केवळ ५ रुपये जुडीला विकली जात आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना मजुरी आणि वाहतूक खर्चही निघत नाही. (Vegetable Market)
वादळ आणि पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पालेभाज्या सडत आहेत. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे टोमॅटो व लिंबाची झाडे कोसळली, तर काही ठिकाणी दुबार लागवडीची वेळ आली आहे. (Vegetable Market)
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात हवामान स्थिर झाल्यास दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांना प्रति एकर हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तातडीने निचरा व्यवस्था आणि जैविक रोगनियंत्रण उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
वादळी पावसामुळे मेथी आणि पालक पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पीक सडत असल्याने बाजारात भाव कमी मिळत आहेत.- जनार्दन कळसकार, शेतकरी, वर्णा
थंडीत मेथीची मोठी मागणी असते म्हणून लागवड केली होती; पण पावसामुळे सर्व होत्याचे नव्हते झाले.- विनोद शेगोकार, शेतकरी, कंझारा
