Tur Kharedi : राज्य शासनाने राज्यात तुरीची हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून तूर हमीभाव खरेदी करीता नोंदणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना तुरीची हमीभावाने विक्री करिता २० जानेवारी २०२६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तूर विक्री करत असताना उत्पादकता मर्यादेच्या आधारे खरेदी केंद्रावर तूर विकता येणार आहे. जिल्हानिहाय प्राथमिक तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे.
- ठाणे ७७० किलो
- पालघर ४५० किलो
- रायगड ६१६.९५ किलो
- सिंधुदुर्ग ००
- रत्नागिरी ६२४.६९ किलो
- नाशिक ६३० किलो
- धुळे ८५० किलो
- नंदूरबार ५०५.९१ किलो
- जळगांव ११०० किलो
- अहिल्यानगर ९०० किलो
- पुणे ६७० किलो
- सोलापूर ८१२ किलो
- सातारा ७०० किलो
- सांगली १४३६.१० किलो
- कोल्हापूर ६७० किलो
- छ. संभाजीनगर ८४१ किलो
- जालना ११०० किलो
- बीड ९५० किलो
- लातूर १५०० किलो
- धाराशीव ९०० किलो
- नांदेड ९५० किलो
- परभणी १२०० किलो
- हिंगोली १२१० किलो
- बुलढाणा १११ किलो
- अकोला १४०० किलो
- वाशिम ९४० किलो
- अमरावती १२९० किलो
- यवतमाळ १२६० किलो
- वर्धा १६५५ किलो
- नागपूर ८०० किलो
- भंडारा ६०० किलो
- गोंदिया ७५०.६२
- चंद्रपूर १४५० किलो
- गडचिरोली १२६६ किलो
Kanda Bajarbhav : 'या' मार्केटमध्ये लाल कांद्याची ८८ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक, भाव कसा मिळाला?
