Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर वाचा सविस्तर

Tomato Market : टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर वाचा सविस्तर

latest news Tomato Market : Tomato growers are now getting strong prices Read in detail | Tomato Market : टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर वाचा सविस्तर

Tomato Market : टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर वाचा सविस्तर

Tomato Market : अवघ्या काही आठवड्यांपूर्वी फेकून देण्यात येणारा टोमॅटो आज सोन्याच्या दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर थेट १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Tomato Market)

Tomato Market : अवघ्या काही आठवड्यांपूर्वी फेकून देण्यात येणारा टोमॅटो आज सोन्याच्या दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर थेट १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Tomato Market)

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : अवघ्या काही आठवड्यांपूर्वी फेकून देण्यात येणारा टोमॅटो आज सोन्याच्या दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारातटोमॅटोचे दर थेट १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Tomato Market)

दीर्घकाल नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू उमटले आहे. पावसामुळे उत्पादन घटले, कीड-रोगाचा फटका बसला आणि आवक घटल्यामुळे टोमॅटोच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.(Tomato Market)

सुमारे महिनाभरापूर्वी ५-६ रुपये किलोने विकला जाणारा टमाटा आज किरकोळ बाजारात १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. ही झपाट्याने झालेली दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र दिलासा ठरली आहे.(Tomato Market)

पावसामुळे आवक घटली

गेल्या काही आठवड्यांतील संततधार पावसामुळे आणि एप्रिल-मे मधील उष्णतेच्या लाटेमुळे टमाट्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच कीड व रोगांचा प्रादुर्भावही वाढला. यामुळे उत्पादनात घट झाली असून, आवक घटल्यामुळे दरात झपाट्याने वाढ झाली आहे.

बाजारातील परिस्थिती

मंगरुळपीर येथील हर्रासीमध्ये विक्रीस आणलेले टोमॅटो ५०-७० रुपये किलो दराने विकले जात आहेत. किरकोळ बाजारात मात्र दर १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. 

शेतकऱ्यांना दिलासा

काही दिवसांपूर्वी टोमॅटो शेतातच नष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रतिकिलो ५०-७० रुपये मिळत आहेत. उत्पादन खर्च निघून काहीसा नफा मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. 

अडत्यांच्या मते, जर आणखी काही काळ अशीच आवक कमी राहिली, तर दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

टोमॅटो हे साठवणूक न होणारे पीक असल्याने बाजारात साठा कमी आणि मागणी जास्त असेल तर दर झपाट्याने वाढतात. यावर्षी हवामानातील अनिश्चिततेमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tomato Market : करमाड बाजारात टोमॅटोची धूम; पावसातही दमदार आवक वाचा सविस्तर

Web Title: latest news Tomato Market : Tomato growers are now getting strong prices Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.