lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

Latest News Todays Sorghum maize and tur market price in market yards | Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज रविवार असल्याने केवळ लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली.

आज रविवार असल्याने केवळ लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज ज्वारीची निवडक बाजार समित्यांमध्ये आवक झाली असून लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. या ज्वारीला सरासरी 2780 रुपये दर मिळाला. काल औराद शहाजानी या बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला सरासरी 3152 रुपये, तुळजापूर बाजारात 3000 रुपये, उमरगा बाजार समितीत 2676 रुपये दर मिळाला. 

आज सिल्लोड बाजार समितीत पिवळ्या मक्याला कमीत कमी 2050 रुपये तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला. तर काल छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत पिवळ्या मक्याला सरासरी 1950 रुपये दर मिळाला. धुळे बाजारात पिवळ्या मक्याला सरासरी 2075 रुपये दर मिळाला. तर भोकरदन बाजार समितीत सरासरी 2100 रुपये दर मिळाला. 

तसेच तुरीची देखील काही बाजार समित्यांमध्ये आवक झाली. यानुसार वरोरा-खांबाडा बाजार समितीत लाल तुरीला 9800 रुपये, तर औसा बाजार समितीत 11200 रुपये दर मिळाला. शेवगाव बाजार समितीत पांढऱ्या तुरीला 10700 रुपये दर मिळाला. तुरीचा भाव दहा हजारी पार गेला असून या पिकाच्या माध्यमातून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. 

Web Title: Latest News Todays Sorghum maize and tur market price in market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.