Lokmat Agro >बाजारहाट > Tandul Market : सध्या तांदळाचे दर काय आहेत, डिसेंबरमध्ये कसे राहतील? वाचा सविस्तर 

Tandul Market : सध्या तांदळाचे दर काय आहेत, डिसेंबरमध्ये कसे राहतील? वाचा सविस्तर 

Latest news Tandul Market see current rice prices, how will they be in December Read in detail | Tandul Market : सध्या तांदळाचे दर काय आहेत, डिसेंबरमध्ये कसे राहतील? वाचा सविस्तर 

Tandul Market : सध्या तांदळाचे दर काय आहेत, डिसेंबरमध्ये कसे राहतील? वाचा सविस्तर 

Tandul Market : सतत सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता असून, नवीन उत्पन्न निघण्यास उशीर आहे.

Tandul Market : सतत सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता असून, नवीन उत्पन्न निघण्यास उशीर आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- लिकेश अंबादे

चंद्रपूर : घरात किंवा सण-उत्सवात जेवणामध्ये चवदार, स्वादिष्ट व रुचकर, बारीक तांदूळ शिजवले जात आहेत. 'जय श्रीराम'चे तांदूळ अनेकांचे आवडते असल्यामुळे या तांदळाची मागणी दुकानात आहे. त्यामुळे सध्या दुकानात ७० रुपये किलोने विकला जात आहे. 

याशिवाय सुगंधित तांदळामध्ये मोहरा, चिन्नुर, बासमती अशा तांदळाला नियमित मागणी नाही. मात्र, विविध प्रकारच्या कार्यक्रमांत व सणावारांत जय श्रीराम हे बारीक तांदूळ ग्राहक खरेदी करतात. मात्र, सध्या सतत सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता असून, नवीन उत्पन्न निघण्यास उशीर आहे.

डिसेंबरपर्यंत दर चढेच ?
सध्या पावसाळा सुरू असून, नियमित पाऊस सुरू राहिला तर धान पिकाचे नुकसान होऊन येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत तांदळाचे दर वाढणार आहेत. ज्यामध्ये बारीक तांदूळ व सुगंधित तांदळाचे दर चढेच राहणार असल्याची माहिती आहे. पाच ते सात रुपयांपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे. सण, उत्सवामध्ये तांदळाचे दर चार ते पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता स्थानिक व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

उत्पादनात घट, मागणीत वाढ
धान कापणी हंगामाला उशीर व रोगामुळे पीक गेले की, उत्पन्न कमी होते. तसेच नवीन उत्पादन निघण्यास उशीर झाला की, बाजारात मागणीत वाढ होते. पावसाळ्यानंतर सण-उत्सवांना सुरुवात झाली असून, या दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांकरिता तांदळाची मागणी वाढली आहे. कोरचीच्या ग्रामीण अनेक कुटुंब ठोकळ तांदळाचा वापर करतात.

सुगंधित तांदळाचे दर वधारलेलेच
शेतकऱ्यांच्या शेतीमधील बारीक व सुगंधित तांदळाचे उत्पादन कमी झाले. मात्र, ग्राहक बारीक तांदूळ घेताना अधिक दिसत आहेत. दुकानात बारीक जय श्रीराम या तांदळाचा दर ७० ते ७५ रुपये किलो झाला असून, हे दर पुढे वाढण्याची शक्यता आहे.

इतर तांदळांचे दर स्थिर, बासमती १६० रूपये किलो
सध्या दुकानात इतर तांदळांचे दर स्थिर आहेत. सणासुदीत किंवा लग्नसराईमध्येच तांदळाची मागणी वाढते. तेव्हा एचएमटी, सुवर्णा, कोलम अशा तांदळांच्या दरामध्ये एक ते दोन रुपयांचा फरक पडतो. सध्या बाजारात या तांदळाचे दर स्थिर आहेत. बाजारपेठेत सध्या जय श्रीराम ७० रूपये किलो, मोहरा ६८ रूपये कोलम ६५ रूपये, रूपाली ५०, एचएमटी ६०, सुवर्णा ४०, बासमती १६० तर कालीमुख चिन्नुर तांदूळ ८० रूपये किलो दराने विकले जात आहे. सर्वाधिक मागणी श्रीराम वाणाच्या तादंळाला नागरिकांकडून होत आहे.


मागील चार महिन्यांमध्ये तांदळाच्या दरात पाच ते सहा रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. ज्यामध्ये सुगंधित व बारीक तांदळाचा समावेश आहे. दुकानात सर्वाधिक जय श्रीरामचा तांदूळ विकला जातो. सण-उत्सवामध्ये बासमती, चिन्नुर हे तांदूळ थोडेफार विकले जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वेळेवर निघाले नाही तर दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
- विकासचंद्र धुवारिया, व्यापारी, कोरची

Web Title: Latest news Tandul Market see current rice prices, how will they be in December Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.