Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market Update : पेरणीच्या तोंडावर सोयाबीन दर झपाट्याने वधारले; आश्वासन की आभास? वाचा सविस्तर

Soybean Market Update : पेरणीच्या तोंडावर सोयाबीन दर झपाट्याने वधारले; आश्वासन की आभास? वाचा सविस्तर

latest news Soybean Market Update: Soybean prices increase rapidly on the eve of sowing; Promise or illusion? Read in detail | Soybean Market Update : पेरणीच्या तोंडावर सोयाबीन दर झपाट्याने वधारले; आश्वासन की आभास? वाचा सविस्तर

Soybean Market Update : पेरणीच्या तोंडावर सोयाबीन दर झपाट्याने वधारले; आश्वासन की आभास? वाचा सविस्तर

Soybean Market Update : खरीप हंगामाच्या ताेंडावर सोयाबीनचे बाजारभाव वाढत ४,४०० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. असे असले तरी या दरवाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दराने माल विकलेला असल्याने हा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे.(Soybean Market Update)

Soybean Market Update : खरीप हंगामाच्या ताेंडावर सोयाबीनचे बाजारभाव वाढत ४,४०० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. असे असले तरी या दरवाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दराने माल विकलेला असल्याने हा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे.(Soybean Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Market Update : खरीप हंगामाच्या ताेंडावर सोयाबीनचेबाजारभाव वाढत ४,४०० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. असे असले तरी या दरवाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दराने माल विकलेला असल्याने हा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे. (Soybean Market Update)

त्यामुळे दरवाढ असूनही खरीप हंगामात शेतकरी नाराज असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

वर्षभर ३,९०० ते ४,००० रुपयांदरम्यान स्थिरावलेले सोयाबीनचे दर सध्या डीओसी (डिऑईल केक) दरवाढीमुळे चढले आहेत; मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच पीक विकलेले असल्याने व्यापाऱ्यांनाच या दरवाढीचा फायदा मिळणार आहे. (Soybean Market Update)

मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस, कीड-रोगाचा प्रकोप आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकरी आधीच अडचणीत होता.

यंदा सोयाबीनसाठी सरकारने ४,८९२ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे, पण प्रत्यक्षात बहुतेक शेतकऱ्यांनी ३,६०० ते ३,८०० रुपयांदरम्यानच त्यांच्याकडील सोयाबीन विकले आहे. (Soybean Market Update)

'नाफेड'ची खरेदी मोहीम उशिरा सुरू झाली आणि हमीभाव खरेदी लवकर बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना बाजारावरच अवलंबून राहावे लागले असल्याचे चित्र आहे.

२० हजार हेक्टरच्या वर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता पेरणी क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वर्षभर हमीभावाच्या तुलनेत १,००० पर्यंत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे यंदा पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

ऐन पेरणीच्या तोंडवर झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी आश्वासन आहे की आभास असा प्रश्न पडला आहे.

पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता

* हमीभावाऐवजी वर्षभर मिळालेल्या कमी दरांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

* त्यामुळे यंदाच्या खरीपात २० हजार हेक्टरहून अधिक पेरणी क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

असे वाढले सोयाबीनचे दर (रु./क्विंटल)

दिनांककिमान दर (₹/क्विंटल)कमाल दर (₹/क्विंटल)
३ मे₹३,९००₹१४,१००
५ मे₹३,९२५₹१४,३००
६ मे₹३,९००₹१४,३५०
७ मे₹४,१११₹१४,३००
८ मे₹१४,०००₹१४,३५०
९ मे₹१४,२५०₹१४,३५०
१० मे₹१४,३००₹१४,४००

'डीओसी' दरवाढ व बियाण्यांची मागणी यामुळे थोडी दरवाढ झाली असली, तरी मोठी उसळी सध्या तरी दिसत नाही.' - विनय लंगोटे, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update: बाजारात 'या' कारणामुळे सोयाबीनची आवक वाढतेय वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Market Update: Soybean prices increase rapidly on the eve of sowing; Promise or illusion? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.