Lokmat Agro >बाजारहाट > Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव 

Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव 

Latest News Shravan Fruit Market see prices of fruits during Shravan month, read the market prices of fruits | Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव 

Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव 

Shravan Fruit Market : सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. 

Shravan Fruit Market : सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : श्रावण महिन्यात बहुसंख्य नागरिक विविध व्रत, उपवास करतात आणि परिणामी फळांची मागणी वाढते. उपवासासाठी आणि पूजेसाठी फळांना विशेष मागणी असते. याच पार्श्वभूमीवर सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. 

पावसाळ्यात अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान, साठवणुकीची अडचण आणि वाहतूक विस्कळीत झाली होत असल्यानेही फळांचा पुरवठा कमी झाला असून, उपलब्ध फळांना मागणी वाढल्याने भावही चढले झाले आहेत. 

विशेषतः, केळी, डाळिंब, सफरचंद आणि पपई अशा फळांचे भाव चांगले आहेत. किरकोळ बाजारात फळांचे दर किलोमागे १० ते ३० रुपयांनी वाढलेले आहेत. किरकोळ बाजारात पूजेसाठी पाच फळांना विशेष मागणी आहे. शंभर रुपयांना पाच या दराने ही फळे मिळत आहेत.
 
काश्मीरचे सफरचंद दाखल
काश्मीरची सफरचंदे मुंबईमार्गे येतात. सध्या ती काहीशी आंबट असल्याने खरेदी जास्त होत नाही. याशिवाय पेरू, मोसंबी, हिरवी द्राक्षे, संत्री, चिकू या फळांचा हंगाम नसल्याने चढत्या दरात फळे विकत आणावी लागतात. पेरूचा हंगाम नसल्याने ते परराज्यांतून येत आहेत. सध्या केळ्यांची मागणी वाढल्याने केळ्यांचेही भाव जास्त आहेत.


फळांचे भाव

  • केळी : ६० रुपये डझन
  • डाळिंब : १६०-२०० रुपये प्रतिकिलो
  • सफरचंद : १५० २०० रुपये प्रतिकिलो
  • पपई : ७० रुपये प्रतिकिलो
  • पेरू : ९० रुपये प्रतिकिलो
  • द्राक्षे : २०० रुपये प्रतिकिलो
  • चिकू : १०० रुपये प्रतिकिलो
  • आलू बुखारा : २०० किलो
  • खरबूज : ५० किलो
  • नाशपती : १५० किलो
  • ड्रॅगन फळ : १५० किलो

Web Title: Latest News Shravan Fruit Market see prices of fruits during Shravan month, read the market prices of fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.