Shetmal Bajarbhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने डिसेंबर २०२५ महिन्यासाठी प्रमुख पिकांच्या संभाव्य किमतींचा सुधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे.(Shetmal Bajarbhav)
या अहवालानुसारए कापूस ७ हजार ११० ते ७ हजार ६१५ रुपये आणि सोयाबीन ४ हजार ५१५ ते ४ हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Shetmal Bajarbhav)
डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या भावांबाबत महत्त्वाचा अंदाज 'स्मार्ट' प्रकल्पाने जाहीर केला आहे. राज्यातील बाजारभाव, मागणी-पुरवठा, व्यापारी व्यवहार आणि हवामानातील बदल यांच्या सखोल विश्लेषणातून तयार झालेल्या या अहवालानुसार कापूस ७११० ते ७६१५ रुपये तर सोयाबीन ४५१५ ते ४८८५ रुपये प्रति क्विंटल मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Shetmal Bajarbhav)
तूर, हरभरा आणि मका या पिकांमध्येही सौम्य वाढ किंवा स्थिरतेची चिन्हे दिसत असून हा अंदाज शेतकऱ्यांच्या विक्री नियोजनाला मोठी दिशा देणारा ठरणार आहे.(Shetmal Bajarbhav)
दराचा अंदाज कसा तयार झाला?
कक्षाने राज्यातील विविध बाजार समित्यांकडून मिळालेल्या दैनंदिन भावांचा बारकाईने अभ्यास केला. तसेच खालील महत्त्वाच्या घटकांचा सखोल विचार करण्यात आला
व्यापारी व्यवहारातील बदल
पिकांचे उत्पादन व साठा स्थिती
राज्यातील व देशातील मागणी-पुरवठा
हवामानातील बदल व त्याचा परिणाम
आयात-निर्यात प्रवाह
बाजारातील व्यवहार आणि फॉरवर्ड ट्रेडिंगचे संकेत
या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून डिसेंबर महिन्यासाठी सुधारित दर अंदाज निश्चित करण्यात आले आहेत.
स्मार्ट प्रकल्पाचे उद्दिष्ट
प्रकल्पानुसार, शेतकऱ्यांना बाजारभावातील चढउतार, योग्य विक्री वेळ, तसेच किंमतींचा भविष्यातील कल याची माहिती मिळावी हा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नियोजन करता येईल
विक्री धोरण निश्चित करणे
साठा व्यवस्थापन
कर्ज व गुंतवणूक नियोजन
या बाबी अधिक परिणामकारकपणे करता येतात.
डिसेंबर २०२५ महिन्याचे संभाव्य शेतमाल दर (प्रति क्विंटल)
| पिकाचे नाव | संभाव्य दर (₹) |
|---|---|
| कापूस (Cotton) | ७११० ते ७६१५ |
| सोयाबीन (Soybean) | ४५१५ ते ४८८५ |
| तूर (Tur/Arhar) | ६४१५ ते ६९५० |
| हरभरा (Chana) | ५००० ते ५५९५ |
| मका (Maize) | १६१० ते १९१५ |
काय म्हणतात बाजार तज्ज्ञ?
तज्ज्ञांनी सांगितले की, सध्याची मागणी आणि तेलबिया बाजारातील हालचाल
कापूस निर्यात परिस्थिती
पिकांचे उत्पादन व साठा
शेतकऱ्यांचा विक्रीचा कल
या सर्व गोष्टी पाहता कापूस आणि सोयाबीनच्या किमतींमध्ये सौम्य वाढ होऊ शकते.
तूर आणि हरभरा हे दर स्थिर ते किंचित वाढीच्या मार्गावर राहतील, तर मका पुरवठ्यानुसार थोड्या चढ- उतारात राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, पिकांची गुणवत्ता, स्थानिक मागणी आणि बाजारातील रोजचे व्यवहार यावर प्रत्यक्ष दर अवलंबून असतात.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
चांगल्या गुणवत्तेचा माल साठवून योग्य दर मिळाल्यावर विक्री करावी
दलालांऐवजी थेट व्यापाराच्या पर्यायांचा विचार करावा
बाजारातील भावाच्या नियमित अपडेटवर लक्ष ठेवावे
स्मार्ट प्रकल्पाच्या शेतमाल किमतीच्या अंदाजांचा वापर विक्री नियोजनासाठी करावा
