संजय लव्हाडे
जालना बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी असली तरी वस्तूंच्या किमती मात्र सातत्याने वाढत आहेत. विशेषतः करडी आणि करडी तेलाच्या(Castor oil) दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. तर बाजरी आणि हरभऱ्याच्या(Bajara, Harbhara) दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Shetmal Bajar Bhav)
दुसरीकडे, भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. किराणा व खाद्यतेलाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.(Shetmal Bajar Bhav)
चालू वर्षात सर्वत्र करडीचे उत्पादन घटले आहे. त्याचा थेट परिणाम करडी तेलाच्या(Castor oil) दरावर झाला आहे. करडीचे दर ७ हजार ५०० ते ८ हजार प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहचले आहेत.(Shetmal Bajar Bhav)
जालना बाजारपेठेत बहुतांश माल देगलूर (जि. नांदेड) येथून येत आहे. करडीचे दर वाढल्यामुळे करडी तेलाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे.
आतापर्यंत पहिल्यांदाच करडी तेलाचे(Castor oil) दर २९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
पूर्वी जालना जिल्ह्यासह परिसरात करडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. कालांतराने करडीचे उत्पादनही घटले व तेलघाणेही कमी झाले. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या करडीवर या बाजारपेठेला अवलंबून राहावे लागले.(Castor oil)
सोयाबीन व सूर्यफूल तेलाचा वापर अतिरिक्त झाल्याने करडी तेलाच्या घाण्यावर याचा परिणाम झाला. शेंगदाणा तेल मात्र १४८ ते १५० रुपये किलोवर स्थिर आहे. सूर्यफूल तेल १५५ रुपयांवर गेले. सोयाबीन तेल १२९ वरून १३५ रुपयांवर पोहोचले.
महागाईमध्ये वाढ सुरूच
सध्या बाजारपेठेत किराणा साहित्यांचेही दर वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ही महागाई गेल्या सहा महिन्यांपासून वाढतच आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे.
सोने ९७ हजारांवर
सोने २०० रुपये, तर चांदी ५०० रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे सोने पुन्हा एकदा लाखाच्या आत आले आहे. भारत-पाकच्या वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून, परिणामी सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. सोन्याचे दर ९७ हजार रुपये प्रतितोळा, तर चांदी ९७ हजार रुपये प्रति किलोपर्यंत येऊन पोहोचली आहे.
शेतमालाचे बाजारभाव
मालाचे नाव | दर (प्रति क्विंटल) |
---|---|
गहू | २४५० – ४५०० |
ज्वारी | २००० – ३४५० |
बाजरी | २१५० – २५८० |
मका | १६५० – २१३० |
तूर | ५००० – ७३०० |
हरभरा | ५००० – ५८०० |
सोयाबीन | ३५०० – ४५०० |
गूळ | ३५०० – ४२०० |
साखर | ३२५० – ४१०० |
खाद्यतेलाचे दर काय आहेत?
तेलाचे नाव | दर (₹) |
---|---|
पामतेल | १३,२०० |
सूर्यफूल तेल | १४,७०० |
सरकी तेल | १३,६०० |
सोयाबीन तेल | १३,४०० |
करडी तेल | २९,००० |