Maize Market : मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या (Maka Market) एप्रिल महिन्यातील सरासरी किंमती पाहिल्या तर मे २०२२ मध्ये २०८३ रुपये प्रति क्विंटल, मे २०२३ रुपये १७४२ रुपये प्रति क्विंटल, तर मे २०२४ २१९७ रुपये प्रति क्विंटल अशा होत्या. यंदाच्या मे २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील (Nandgaon Market) किंमत कमीत कमी २१०० ते सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल राहील, अशी शक्यता आहे.
मका हे आंतराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेटिना आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अश्या तिन्ही हंगामात घेतली जाते. प्रमुख मका उत्पादक (Maka Farmers) राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांचा समावेश होतो.
देशात चालू वर्षीच्या मार्च २०२५ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या मार्च २०२४ च्या तुलेनत ३८.२० टक्क्यांनी वाढली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ७४.१२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी मका पिकाची किमान आधारभूत किमत (MSP) रु. २२२५ प्रत्ति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे.
निर्यातीत घट होईल?
भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो, या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असती. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये, जगात मागील वर्षांच्या तुलनेत ०.६ टक्के मक्याचे उत्पादन घट होण्याच्या अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात २०२४-२५ मध्ये ६ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे, जी २०२३-२४ च्या तुलनेत २५ टक्के घट होईल असा अंदाज आहे.
मक्याचे उत्पादनात घट
देशांतर्गत किमती वाढल्यामुळे आणि पिक कमी झाल्यामुळे २०२३-२४ या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षांच्या निचांकी पातळीवर घसरली. इथेनॉल, कुक्कुटपालन आणि स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळेही निर्यातीत घट झाली. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये, भारतात मागील वर्षाच्या तुलनेत १.५ टक्के मक्याचे उत्पादनात घट होण्याच्या अंदाज आहे. तसेच सन २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये मक्याचे उत्पादनात ०.९० टक्के वाढ होण्याचा असा अंदाज आहे.