Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Tur harbhara Market : अमळनेर मार्केटला हरभरा-तुरीची विक्रमी आवक, क्विंटलमागे दर कसा मिळतोय? 

Tur harbhara Market : अमळनेर मार्केटला हरभरा-तुरीची विक्रमी आवक, क्विंटलमागे दर कसा मिळतोय? 

Latest news Record arrival of gram and gram flour in Amalner market, how is market prices | Tur harbhara Market : अमळनेर मार्केटला हरभरा-तुरीची विक्रमी आवक, क्विंटलमागे दर कसा मिळतोय? 

Tur harbhara Market : अमळनेर मार्केटला हरभरा-तुरीची विक्रमी आवक, क्विंटलमागे दर कसा मिळतोय? 

Tur harbhara Market : सध्या हरभरा तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येते.

Tur harbhara Market : सध्या हरभरा तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येते.

अमळनेर : रब्बी हंगामातील हरभरा व तूर पिकांना चांगले उत्पादन मिळाल्याने तसेच माल विक्रीनंतर तत्काळ रोखीने देयक मिळत असल्यामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढला आहे.

सध्या हरभरा मालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धुळे रोडवर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येते. बाजार समिती प्रशासनाने वाहन क्रमांकानुसार लिलाव व विक्री प्रक्रिया राबविल्याने गोंधळ टळत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या क्रमांकानुसार माल विक्रीची संधी दिली जात आहे.

विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांची गर्दी चोपडा, पारोळा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, शिरपूर तसेच बेटावद व नरडाणा परिसरातील शेतकरी माल विक्रीसाठी अमळनेर बाजार समितीकडे येत आहेत. योग्य दर, त्वरित रोखीने देयक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे.

हरभरा-तुरीला समाधानकारक दर

  • ४८०० ते ५२०० बाजार समितीत गावरान हरभरा प्रतिक्विंटल दर
  • ७५०० रुपये ते ८००० रुपये डॉलर हरभरा
  • ६५०० रुपये ते ७५०० रुपयांनी तुरीचे दर गुणवत्तेनुसार प्रतिक्विंटल
  • ५००० रुपये ते ५२०० रुपये दर व्ही-२ हरभरा मिळत आहेत.
  • १५ ते २० हजार क्विंटल हरभऱ्याची आवक
  • ३०० ते ३५० क्विंटल तुरीची आवक नोंदवली जात आहे.

 

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी बांधवांना सन्मानजनक दर मिळावा, यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. शिस्तबद्ध नियोजन, पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि वेळेवर व्यवहार पूर्ण होत असल्याने सकाळी बाजारात आलेला शेतकरी संध्याकाळी समाधानाने घरी परततो. याच विश्वासामुळे बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा वाढता ओढा दिसून येत आहे."
- अशोक आधार पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

 

महाग तरीही भारतीय तुरीला म्यानमारची लेमन तूर पडतेय भारी, नेमकं कारण काय?
 

Web Title : अमलनेर मंडी में चने और तुअर की रिकॉर्ड आवक

Web Summary : अमलनेर मंडी में अच्छी उपज और तत्काल भुगतान के कारण चने और तुअर की भारी आवक हुई। आसपास के किसान उचित मूल्य और संगठित प्रबंधन से आकर्षित होकर बेचने आते हैं। चने ₹4800-₹8000/क्विंटल, तुअर ₹6500-₹7500/क्विंटल में बिक रही है।

Web Title : Amalner Market Sees Record Arrival of Chickpeas and Tur

Web Summary : Amalner market witnesses huge chickpea and tur arrivals due to good production and instant payments. Farmers from nearby areas flock to sell, drawn by fair prices and organized management. Chickpeas fetch ₹4800-₹8000/quintal, tur ₹6500-₹7500/quintal.