Tur Market : गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव वाढण्यास सुरवात झाली आहे. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या मार्च मधील सरासरी किंमती कशा होत्या. त्याचबरोबर चालू हंगामातील मार्च महिन्यात हे दर कसे राहतील हे पाहुयात...
मागील तीन वर्षातील मार्च महिन्यातील तुरीचे दर
- मार्च २०२३ मध्ये ८ हजार २०४ रुपये प्रति क्विंटल
- मार्च २०२४ मध्ये १ हजार ११२ रुपये प्रति क्विंटल
- मार्च २०२५ मध्ये ७ हजार ३१४ रुपये प्रति क्विंटल
या मार्च महिन्यात तुरीच्या संभाव्य किंमती : ७ हजार ६९० रुपये ते ८ हजार ३४५ रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP ८ हजार रुपये प्रति क्विंटल) असून सध्याच्या तुरीच्या किंमती MSP च्या दिशेने जाताना दिसून येत आहे.
वर्ष २०२४-२५ मध्ये तुरीच्या आयाती मध्ये वाढ झालेली असून निर्यात कमी कमी झालेली आहे. तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या प्रथम अग्रीम उत्पादन अंदाज सन २०२५-२६ नुसार तुरीचे उत्पादन सुमारे ३५.९७ लाख टन होण्याची शक्यता आहे.
तसेच महाराष्ट्रातील सन २०२४-२५ मध्ये १३.३ लाख टन आहेत. माहे जानेवारी ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष फेब्रुवारी २०२६ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून मार्च २०२६ या कालावधीसाठी तूर पिकांच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे.
