PM Kisan Update : पीएम किसान सन्मान (PM Kisan Yojana) योजनाच्या अंतर्गत पात्र असलेल्या परंतु काही कारणास्तव गेल्या काही हप्त्यांपासून हप्ते मिळत नसलेल्या आणि नव्याने नोंदणी केलेल्या परंतु अद्यापही त्यांची नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आली आहे.
पी एम किसान च्या पोर्टलवर एक नवीन अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे काही कागदपत्रास्तव किंवा काही त्रुटींमुळे नोंदणी रिजेक्ट करण्यात आलेली असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याचे येणारे हफ्ते बंद झालेले असतील किंवा नवीन शेतकऱ्यांना काही कागदपत्र अपलोड करण्यासाठीचा पर्याय होता, तो बंद करण्यात आला. त्यानंतर नवीन नोंदणी अप्रूव झालेली नव्हती. अशा शेतकऱ्यांना आता अपडेट मिसिंग इन्फॉर्मशन नावाचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अपडेट मिसिंग इन्फॉर्मशन या पर्यायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला चुकीचा असलेला डाटा करेक्ट करता येणार आहे. शिवाय नवीन कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली असेल तर ती कागदपत्र या पर्यायातून अपलोड करता येणार आहेत.
शिवाय ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी हप्ते आलेले आहेत मात्र काही कारणास्तव हप्ते थांबवण्यात आलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांना देखील काही त्रुटी असतील, त्या त्रुटी दुरुस्त करण्याची संधी या पर्यायाद्वारे मिळणार आहे.
मग आधार कार्ड असेल जमिनीचा फेरफार असेल किंवा इतर कागदपत्रे असतील, ती देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वरील अडचणी येत असेल त्यांनी अपडेट ऑफ मिसिंग बेनिफिशरी इन्फॉर्मेशन हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करून आपला पीएम किसान हफ्ता सुरळीत करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.