Lokmat Agro >बाजारहाट > Lasalgaon Market : लासलगाव मार्केट झाले डिजिटल, शेतकऱ्यांच्या मालाचे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर होणार

Lasalgaon Market : लासलगाव मार्केट झाले डिजिटल, शेतकऱ्यांच्या मालाचे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर होणार

Latest news Online money transfer of farmers crops will be done in Lasalgaon market | Lasalgaon Market : लासलगाव मार्केट झाले डिजिटल, शेतकऱ्यांच्या मालाचे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर होणार

Lasalgaon Market : लासलगाव मार्केट झाले डिजिटल, शेतकऱ्यांच्या मालाचे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर होणार

Lasalgaon Market : शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री केल्यांनतर अँपद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत.

Lasalgaon Market : शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री केल्यांनतर अँपद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market) आता डिजिटल झाली असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री केल्यांनतर अँपद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांची सदर अँप डाऊनलोड करून kyc नोंदणी करण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांसह तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतमाल विक्रीची संपुर्ण रक्कम बंतोष अँप (Bantosh App) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यावर Online पध्दतीने वर्ग करणेसाठी संबंधित शेतकरी बांधवांची KYC नोंदणी प्रक्रिया बाजार समितीच्या लासलगांव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नविन कांदा बाजार आवारातीत कार्यालयात दि. ०९ जानेवारी, २०२५ पासून सुरू होत आहे. 

KYC केल्याचे शेतकऱ्यांना फायदे :

  • बाजार समितीच्या आवक व बाजारभावासह विविध प्रकारची शासकीय अनुदाने, कृषि क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी आणि इतर कृषि विषयक माहिती तात्काळ मिळणार.
  • बाजार समितीत विक्री केलेल्या शेतीमालापासुन मिळालेल्या उत्पन्नाचे डिजीटल प्रमाणपत्र मिळणार.
  • विक्री केलेल्या सर्व शेतीमालाची चुकवती रक्कम Online मिळणेसाठी डिजीटल ID कार्ड मिळणार.
  • व्यवहारांसाठी सौदापट्टी, काटापट्टी आणि हिशोबपट्टी अॅपमध्ये उपलब्ध असणार.
  • नोंदविलेल्या बँक खात्यावर थेट Online Payment त्वरीत मिळणार.
  • शेतमाल विक्री व्यवहारांचे ऑनलाईन स्टेटमेंट त्वरीत मिळणार.
  • एक कुटूंब एक अकाऊंट सुविधा. 


दि. ०१ जानेवारी, २०२५ पासुन आपली KYC नोंदणी करणेसाठी आपता चालू तारखेचा ७/१२ उतारा, खाते उतारा, आधार कार्ड व बँक खाते पासबुक आणुन बाजार समितीच्या कार्यालयात आपली नोंदणी करून घ्या. नविन वर्षात बाजार समितीच्या विद्यमान सदस्य मंडळाने हाती घेतलेल्या उपक्रमात सहभागी होऊन डिजीटल क्रांतीचे साक्षीदार होण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बदलत्या काळानुरूप बाजार समितीच्या बाजार आवारांवर शेतीमाल विक्रीस आलेल्या शेतकरी बांधवांना त्यांची शेतीमाल विक्री रक्कम थेट त्यांच्या बॅक खात्यावर वर्ग करणेसाठी बाजार समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली KYC नोंदणी करून घ्यावी. 
- नरेंद्र वाढवणे, सचिव, कृ. उ. बा. स., लासलगांव.
 

Web Title: Latest news Online money transfer of farmers crops will be done in Lasalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.