Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Onion Export : कंटेनर रवाना झाला, पण अचानक मध्यपूर्वेत तणाव; कांदा निर्यातीवर ब्रेक वाचा सविस्तर

Onion Export : कंटेनर रवाना झाला, पण अचानक मध्यपूर्वेत तणाव; कांदा निर्यातीवर ब्रेक वाचा सविस्तर

latest news Onion Export: Container leaves, but suddenly tension in the Middle East; Break on onion export Read in detail | Onion Export : कंटेनर रवाना झाला, पण अचानक मध्यपूर्वेत तणाव; कांदा निर्यातीवर ब्रेक वाचा सविस्तर

Onion Export : कंटेनर रवाना झाला, पण अचानक मध्यपूर्वेत तणाव; कांदा निर्यातीवर ब्रेक वाचा सविस्तर

Onion Export : मराठवाड्यातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासूर स्टेशनमधून ९०० क्विंटल लाल कांदा दुबईसाठी निर्यात करण्यात आला आहे. मात्र, इस्रायल-इराक तणावामुळे मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या मालवाहतुकीवर मर्यादा आल्याने नवीन बुकिंग तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे कांदा निर्यात आणि बाजारभावावर काय परिणाम होणार, याकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Onion Export)

Onion Export : मराठवाड्यातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासूर स्टेशनमधून ९०० क्विंटल लाल कांदा दुबईसाठी निर्यात करण्यात आला आहे. मात्र, इस्रायल-इराक तणावामुळे मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या मालवाहतुकीवर मर्यादा आल्याने नवीन बुकिंग तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे कांदा निर्यात आणि बाजारभावावर काय परिणाम होणार, याकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Onion Export)

रामेश्वर श्रीखंडे

मराठवाड्यातील सर्वात मोठी कांदाबाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती मधून २८ फेब्रुवारी रोजी ९०० क्विंटल दर्जेदार लाल कांदा दुबईसाठी रवाना करण्यात आला.(Onion Export)

मात्र, त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे १ मार्चपासून मुंबईतील बंदरांवरून मध्य पूर्व आशियाकडे जाणाऱ्या मालवाहतुकीवर मर्यादा आल्या असून नवीन बुकिंगही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा निर्यातीला अनिश्चिततेची छाया निर्माण झाली आहे.(Onion Export)

२४०० गोण्या, तीन कंटेनरमधून निर्यात

लासूर बाजार समितीत जिल्ह्यातील विविध भागांतून उच्च प्रतीचा लाल कांदा विक्रीसाठी येतो. येथील व्यापारी शुभम चंद्रकांत पवार यांनी खरेदी केलेल्या कांद्याची निर्यातीसाठी निवड करण्यात आली. ३८ किलो वजनाच्या २४०० गोण्यांचे पॅकिंग करून एकूण तीन कंटेनरमधून ९०० क्विंटल कांदा मुंबई बंदर मार्गे दुबई येथे जहाजाद्वारे पाठविण्यात आला.

हा निर्यातीचा तिसरा टप्पा होता.

पहिला कंटेनर १२ फेब्रुवारी रोजी रवाना झाला असून त्याची विक्री यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.

दुसरा कंटेनर २० फेब्रुवारी रोजी पाठविण्यात आला असून तो सध्या दुबई बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

तिसरा कंटेनर २८ फेब्रुवारी रोजी मुंबई बंदरातून रवाना झाला असून पुढील तीन दिवसांत दुबईत पोहोचण्याची अपेक्षा होती.

इस्रायल-इराक तणावाचा परिणाम

तिसरा कंटेनर निघाल्यानंतर लगेचच १ मार्चपासून अमेरिका तसेच इस्रायल–इराक दरम्यान वाढलेल्या तणावामुळे मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या जहाज वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. परिणामी नवीन निर्यात बुकिंग तात्पुरती बंद करण्यात आली असून व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मान्यवरांच्या हस्ते कंटेनरचे पूजन

२८ फेब्रुवारी रोजी सकाळी बाजार समितीच्या आवारात कंटेनरचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी सभापती शेषराव जाधव, उपसभापती अनिल चव्हाण, सचिव संतोष पवार आणि ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत पवार यांच्या हस्ते पूजा पार पडली.

यावेळी संचालक मनीष पाटील पोळ, प्रकाश मुथा, सुनील पाखरे, अशोक जगताप, भाऊसाहेब चिंधे, सुबोध मुथा, इंजिनिअर संतोष उदावंत आदी उपस्थित होते.

निर्यातदारांसमोर अनिश्चिततेचे सावट

लासूर बाजार समितीमार्फत होणारी कांदा निर्यात ही स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे.

मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थितीतील तणावामुळे वाहतुकीवर मर्यादा आल्याने आगामी निर्यात व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तिसऱ्या कंटेनरची विक्री सुरळीत पार पडावी, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Ativrushti Anudan : २ वर्षांची प्रतीक्षा संपली! 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २२ कोटी जमा

अधिक वाचा : Sorghum Seed Issue : सुधारितच्या नावाखाली हायब्रीड? ज्वारी बियाणे वाटपावरून शेतकऱ्यांचा संताप

Web Title: latest news Onion Export: Container leaves, but suddenly tension in the Middle East; Break on onion export Read in detail