Nashik Kanda Market : गेल्या सहा सात महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावामुळे हैराण आहेत. चाळीतला कांदाही संपला मात्र भाव काही मिळाला नाही. त्यानंतर बांगलादेशने आयातीचा निर्णय घेतल्यांनंतर काही अंशी का होईना दरात काहीशी वाढ झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशांतर्गत मार्केटमध्ये नाशिकच्या कांद्याला डिमांड वाढली आहे.
बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हळूहळू कांदा निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातही फरक दिसू लागला आहे. आज सकाळ सत्रामध्ये लासलगाव - विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १७०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १५५० रुपये, देवळा बाजारात १७५० रुपये तर याच बाजारात लाल कांद्याला १७५० रुपये दर मिळाला.
तर दुसरीकडे देशांतर्गत मार्केटचा विचार करता राजस्थानातील अलवर मार्केटमध्ये सरासरी २२०० रुपये, इंदोर मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपये, तर नाशिकच्या नव्या कांद्याला २७०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि मध्यम कांद्याला २२०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. आज घोजदरांगा या बॉर्डरवर कांद्याच्या तब्बल ११ गाड्या पोहचल्या आहेत.
