Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नाफेड कांदा खरेदीची प्रतीक्षा संपली, नोंदणी झाली सुरु, अशी करा नाव नोंदणी? 

नाफेड कांदा खरेदीची प्रतीक्षा संपली, नोंदणी झाली सुरु, अशी करा नाव नोंदणी? 

Latest News Nafed kanda kharedi Nafed Onion Purchase Registration Started, How to Register | नाफेड कांदा खरेदीची प्रतीक्षा संपली, नोंदणी झाली सुरु, अशी करा नाव नोंदणी? 

नाफेड कांदा खरेदीची प्रतीक्षा संपली, नोंदणी झाली सुरु, अशी करा नाव नोंदणी? 

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेडच्या कांदा खरेदीची (Nafed) प्रतीक्षा संपली आहे.

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेडच्या कांदा खरेदीची (Nafed) प्रतीक्षा संपली आहे.

Nafed Kanda Kharedi : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नाफेड कांदा खरेदीच्या (Nafed Kanda Kharedi) प्रतीक्षेत आहेत. एप्रिलमध्ये निविदा काढल्यानंतर जवळपास दोन महिने उलटूनही खरेदी सुरु झालेली नाही. मात्र याबाबत एक दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. 

अखेर नाफेडच्या खरेदीला (Nafed) लवकरच मुहूर्त सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नाफेडच्या मार्फ़त शेतकऱ्यांची नाव नोंदणीला सुरवात झाली आहे. नाफेडच्या अधिकृत पोर्टलवर याबाबत विंडो खुली करण्यात आली असून शेतकऱ्यांना यात नाव नोंदणी करता येणार आहे. 

नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी (Kanda Kharedi) केली जाणार आहे. त्यासाठी शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नसून नोंदणी सुरु झाल्याने लवकरच खरेदीला देखील सुरवात होईल अशी शक्यता आहे. 

कशी कराल नोंदणी? 

  • सर्वप्रथम नाफेडच्या https://www.epravaha.com/nafed/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 
  • या ठिकाणी नव्याने पेज ओपन झाल्यानंतर New Self-registration for Onion R-25 farmers या पर्यायावर क्लिक करा. 
  • यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल. 
  • यात REGISTRATION OF FARMERS असा पर्याय दिसून येईल. 
  • त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आलेल्या ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा. 
  • एक नोंदणी फॉर्म ओपन होईल. सर्वात आधी आधार ओटीपी व्हेरिफाय करा. 
  • पुढे शेतकऱ्याचे नाव, पासवर्ड तयार करा, तसेच आधार अपलोड करा, पत्ता लिहा, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिन कोड टाकून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून नोंदणी फॉर्म भरून घ्या.
     

Web Title: Latest News Nafed kanda kharedi Nafed Onion Purchase Registration Started, How to Register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.