Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Market Update : 'ट्रेड डील'चा फटका! कापूस, सोयाबीन, मक्याच्या दरात ७ ते १० टक्क्यांची घसरण वाचा सविस्तर

Market Update : 'ट्रेड डील'चा फटका! कापूस, सोयाबीन, मक्याच्या दरात ७ ते १० टक्क्यांची घसरण वाचा सविस्तर

latest news Market Update: 'Trade Deal' Hit! Cotton, soybean, corn prices fall by 7 to 10 percent Read in detail | Market Update : 'ट्रेड डील'चा फटका! कापूस, सोयाबीन, मक्याच्या दरात ७ ते १० टक्क्यांची घसरण वाचा सविस्तर

Market Update : 'ट्रेड डील'चा फटका! कापूस, सोयाबीन, मक्याच्या दरात ७ ते १० टक्क्यांची घसरण वाचा सविस्तर

Market Update : जानेवारी महिन्यात दरवाढीमुळे दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. कापूस, सोयाबीन आणि मक्याच्या दरात ७ ते १० टक्क्यांची घसरण झाली असून बाजारातील बदलत्या घडामोडींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Market Update)

Market Update : जानेवारी महिन्यात दरवाढीमुळे दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. कापूस, सोयाबीन आणि मक्याच्या दरात ७ ते १० टक्क्यांची घसरण झाली असून बाजारातील बदलत्या घडामोडींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Market Update)

खरीप हंगामानंतर शेतमालाच्या दरात काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना कापूस, सोयाबीन आणि मक्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. (Market Update)

जानेवारी महिन्यात कापूस आणि सोयाबीनच्या दरात तेजी आली होती. मात्र, ही तेजी अवघ्या १५ दिवसांतच ओसरली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या पिकांचे दर पुन्हा किमान आधारभूत किंमत (MSP) खाली आले आहेत. (Market Update)

तज्ज्ञांच्या मते, भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य ट्रेड डीलच्या चर्चेचा भारतीय शेतमाल बाजारावर मानसिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.(Market Update)

जानेवारीत तेजी, फेब्रुवारीत घसरण

खरीप पणन हंगाम सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कापूस, सोयाबीन आणि मक्यासह अनेक शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा कमी होते.

सरकारकडून एमएसपी दराने खरेदी प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांनी दर वाढीच्या आशेने शेतमाल विक्री टाळली होती.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कापसाचे कमाल दर प्रतिक्विंटल सुमारे ८ हजार ६०० रुपये तर सरासरी दर ८ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्याचवेळी सोयाबीनचे कमाल दर ५ हजार ८०० रुपये आणि सरासरी दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढले होते. मात्र, मक्याचे दर या काळातही एमएसपीच्या खालीच राहिले.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परिस्थिती अचानक बदलली. कापसाचे कमाल दर ७ हजार ९५० रुपये आणि सरासरी दर ७ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली आले.

सोयाबीनचे कमाल दर ५ हजार ३०० रुपये तर सरासरी दर ४ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले. या घसरणीचे प्रमाण सरासरी ७ ते १० टक्क्यांपर्यंत असल्याचे बाजार निरीक्षकांचे म्हणणे आहे.

ट्रेड डीलचा बाजारावर मानसिक परिणाम

भारतीय शेतमाल बाजार अत्यंत संवेदनशील असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर दरवाढीच्या पावत्या किंवा सरकारी निर्णयांच्या चर्चेमुळे बाजारातील मागणी-पुरवठ्यावर परिणाम होतो.

भारत-अमेरिका ट्रेड डीलच्या चर्चेमुळे आयात वाढण्याची शक्यता व्यक्त होताच बाजारात खरेदीदारांनी सावध भूमिका घेतली. याचा थेट परिणाम कापूस आणि सोयाबीनच्या दरावर झाल्याचे दिसून आले आहे.

प्रक्रिया उद्योगांचा आखडता हात

ट्रेड डीलच्या शक्यतेमुळे देशातील तेलबिया प्रक्रिया उद्योगांनी सोयाबीनसह अन्य पिकांच्या खरेदीत घट केली आहे. आयात वाढल्यास स्थानिक उत्पादनाला फटका बसू शकतो, या भीतीमुळे उद्योगांनी खरेदी कमी केल्याचे सांगितले जात आहे.

सोयाबीन तेल आणि पशुखाद्याच्या शुल्कमुक्त आयातीची शक्यता व्यक्त होत असल्याने सरकीच्या दरात घसरण झाली. सरकीचे दर कमी झाल्यामुळे कापसाच्या दरावरही दबाव निर्माण झाला आहे.

मक्याच्या दरावर कायम दबाव

इथेनॉल आणि पशुखाद्य उद्योगांकडून अपेक्षित प्रमाणात मागणी न मिळाल्यामुळे मक्याचे दर आधीपासूनच दबावात आहेत. 

जागतिक बाजारात मक्याचे दर कमी असल्याने आयातीचा धोका वाढू शकतो, अशी भीती उद्योगांना वाटत आहे. त्यामुळे मक्याच्या दरात स्थिरता येण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

दरवाढीच्या अपेक्षेने शेतमाल साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना दर घसरणीचा मोठा फटका बसला आहे. एमएसपी दराने खरेदी प्रक्रिया मर्यादित असल्याने अनेक शेतकऱ्यांना कमी दरात शेतमाल विक्री करण्याची वेळ येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेतील बदल, आयात-निर्यात धोरणे आणि उद्योगांची खरेदी क्षमता यावर शेतमालाच्या दरांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत बाजारातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : शिमग्याआधीच उन्हाळा सुरू? कोकण ते विदर्भ उष्ण वाऱ्यांचा जोर वाढणार वाचा सविस्तर

Web Title : व्यापार सौदे का असर: कपास, सोयाबीन, मक्का की कीमतों में 7-10 प्रतिशत की गिरावट

Web Summary : व्यापार सौदे की चर्चा के कारण कपास, सोयाबीन और मक्का की कीमतों में 7-10% की गिरावट आई है। जनवरी में हुई वृद्धि उलट गई, MSP से नीचे गिर गई। बाजार व्यापार वार्ता के प्रति संवेदनशील, किसान की आय प्रभावित।

Web Title : Trade deal impact: Cotton, soybean, maize prices fall 7-10 percent.

Web Summary : Cotton, soybean, and maize prices decline 7-10% due to trade deal talks. January's gains reversed, falling below MSP. Market sensitive to trade discussions, impacting farmer's income.