Halad Market : मागील आठवड्यात वसमत बाजारात हळदीची किंमत (Halad Market) १२ हजार ४७९ रुपये प्रतिक्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या (halad Aavak) आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २.१५ टक्के व १.५७ टक्के इतकी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी नांदेड बाजारात (Nanded Halad Market) हळदीची सरासरी किंमत सर्वाधिक १२ हजार ८५० रुपये क्विंटल होती, तर हिंगोली बाजारात सर्वात कमी किंमत १२ हजार ४५० रुपये क्विंटल होती.
२०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य १०८१.३४ दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत ७.१९ टक्के च्या सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी २०३१ पर्यंत १६४०.१३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल.
हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८० टक्के योगदान आहे, त्यानंतर चीन (८%), म्यानमार (४%), नायजेरिया (३%) आणि बांगलादेश (३%) यांचा क्रमांक लागतो.
सन २०२२-२३ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत.
मागील आठवड्यात निवडक बाजारातील हळदीच्या किमती पाहिल्या असता वसमत बाजारात १२ हजार ४७९ रुपये, सांगली बाजारात १२ हजार ५६१ रुपये, नांदेड बाजारात १२ हजार ८५० रुपये, हिंगोली बाजारात १२ हजार ४५० रुपये, तर रिसोड बाजारात १२ हजार ४६५ रुपये दर मिळाला.
स्रोत : हळद आउटलुक अहवाल