Market Committee : वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील धान्याच्या किमान आणि कमाल दरात प्रचंड तफावत दिसून येत आहे. किमान दर अतिशय कमी नोंदवले जात असताना, कमाल दर मात्र सर्वच ठिकाणी जवळपास समान ठेवला जात आहे. (Market Committee)
बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात मोठी तफावत दिसून आली आहे. किमान दर खूपच कमी ठेवले जात असताना, कमाल दर मात्र सर्वत्र जवळपास समान आहेत.
सोयाबीन, तूर, मूग-उडीद, गहू व ज्वारीच्या भावातील ही विसंगती शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत असून, व्यापाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त होत आहे. (Market Committee)
सोयाबीन दरांतील विसंगती
१ ऑक्टोबर रोजी मानोरा येथे सोयाबीनचा किमान दर ३ हजार ८५० रुपये, तर मंगरुळपीर येथे फक्त ३ हजार ४०० रुपये नोंदवला गेला. परंतु कमाल दर मात्र सर्वत्र जवळपास समान राहिला.
४ हजार ४५० ते ४ हजार ४८५ रुपयांच्या आसपास. वाशिममध्ये सोयाबीनचा दर ३ हजार ८०० ते ४ हजार ४७५ रुपये असा होता. किमान दरात तब्बल ४५० रुपयांहून अधिक फरक असताना, कमाल दरातील स्थिरता शेतकऱ्यांना खटकत आहे.
तुरीत मोठा फरक
मानोरा येथे तुरीचा किमान दर ५ हजार ७५० रुपये, तर मंगरुळपीर येथे तो केवळ ४ हजार रुपये इतका कमी नोंदवला गेला. किमान दरात तब्बल १ हजार ७५० रुपयांचा फरक असूनही, कमाल दर दोन्ही ठिकाणी ६ हजार १५० रुपयांच्या आसपासच राहिला.
गहू व ज्वारीचे दर
गव्हाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती दिसून आली.
मानोरा : २ हजार ६२५ ते २ हजार ७०० रुपये
मंगरुळपीर : २ हजार ते २ हजार ६७० रुपये
वाशिम : २ हजार ३०० ते २ हजार ५७५ रुपये
ज्वारीतही मोठी तफावत
मंगरुळपीर : १ हजार ६६० ते १ हजार ७४० रुपये
वाशिम : १ हजार ३३० ते १ हजार ५२० रुपये
मूग व उडीदाचे भाव
मुगामध्ये किमान दरात तब्बल ३ हजार रुपयांचा फरक आहे.
मानोरा : ३ हजार ५०० ते ६ हजार रुपये
मंगरुळपीर : १ हजार ५०० ते ४ हजार रुपये
वाशिम : ४ हजार ५०० ते ६ हजार ४०१ रुपये
उडीदाच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, किमान दर ३ हजार ते ४ हजाराच्या दरम्यान तर कमाल दर ६ हजारांच्या आसपास स्थिर आहे.
व्यापाऱ्यांचा फायदा, शेतकऱ्यांचे नुकसान
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, व्यापारी संगनमत करून कमाल दर ठराविक पातळीवर ठेवतात. किमान दर मात्र अतिशय कमी ठेवला जातो. त्यामुळे वाढीव दराचा लाभ केवळ काही मोजक्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहतो, तर बहुतांश शेतकऱ्यांना आपला माल कमी भावानेच विकावा लागतो.
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये धान्य दरातील किमान व कमाल तफावत शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. व्यापाऱ्यांच्या संगनमताचा संशय अधिक गडद झाला असून, यावर नियंत्रणासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारात तेजी की मंदी? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव