Market Committee : नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रगतीचं नवं शिखर गाठत अखेर 'ब' वर्ग दर्जा प्राप्त केला आहे. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत पाटील ढेपे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने केलेल्या नियोजनबद्ध कामकाजामुळे हे यश मिळाले. (Nandgaon Khandeshwar Market Committee)
मागील दोन वर्षांत १.७५ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली असून, आणखी पावणेतीन कोटींच्या कामांचा आराखडा तयार आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभ्या राहिलेल्या या यशामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.(Nandgaon Khandeshwar Market Committee)
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आणि सहकार चळवळीचा गौरव करणारी आनंददायी बातमी म्हणजे नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. (Nandgaon Khandeshwar Market Committee)
तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा ठरला असून, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत पाटील ढेपे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने केलेल्या नियोजनबद्ध कामकाजामुळेच हे यश मिळाले आहे.
सभापती प्रभात पाटील ढेपे व उपसभापती विलास पाटील सावदे यांनी याबद्दल आनंद यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास, अडते, व्यापारी आणि अन्य घटकांचे सहकार्य यामुळेच हा दर्जा मिळवता आला.
दोन वर्षांत १.७५ कोटींची विकासकामे पूर्ण
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
या कामांमध्ये
६५x१०० चौरस फुटाचे दोन नवे लिलाव ओटे
८० टन क्षमतेचा अत्याधुनिक वजन काटा
अंतर्गत रस्ते
सौरऊर्जेवर चालणारी सोलर सिस्टम यांचा समावेश आहे.
नव्याने प्रस्तावित विकासकामे
बाजार समितीच्या पुढील विकास आराखड्यातही महत्त्वपूर्ण कामांचा समावेश असून, पावणेतीन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन (महाराष्ट्र शासनाच्या ५०% अनुदानासह)
बाजार समितीच्या निधीतून उर्वरित १ कोटी ५२ लाखांचा वाटा मंजूर
ओपन लिलाव ओट्यावर टीन शेड (सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्च) , अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
सभापती प्रभात पाटील ढेपे व उपसभापती विलास पाटील सावदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील. तालुक्यातील सहकार चळवळीला बळकटी देणारी बाजार समिती भविष्यातही नवे आदर्श निर्माण करेल.