पुणे : मकरसंक्रांत सण येत्या बुधवारी आहे. या पार्श्वभूमीवर गावरान तिळाला चांगलीच मागणी असते. तीळ असो, तिळाचे लाडू असो याला विशेष महत्व असते. दोन दिवसांवर आलेल्या संक्रातीच्या सणाच्या निमित्ताने तिळाचे दर कसे आहेत, ते पाहुयात...
मकर संक्रातीच्या सणाला रेडिमेड तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, साखर तसेच गुळाची रेवडी, हळदी-कुंकवाचे वाण खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. बाजारात तिळगूळ खरेदीसाठी दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकाने लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डात खरेदीसाठी येत आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव थोडे वधारले असतानाही संक्रांतीनिमित्त तीळ खेरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी तिळगुळाची खरेदी होत आहे. तिळाचे लाडू २८० ते ३२० रुपये प्रतिकिलो, गुळाची रेवडी १८० ते २०० रुपये, १०० ते १२० रुपये किलो असे भाव असल्याचे व्यापारी सुनील पंजाबी यांनी सांगितले.
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ अत्यंत पोषक आणि आवश्यक घटक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीळ उत्पादन कमी झाले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे खराब मालाचे प्रमाण जादा असल्याने चांगल्या प्रतीच्या तिळाला मागणी अधिक असून दरही वाढले आहेत. मागणी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी तीळ आणि गुळाच्या दरात १० टक्के ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः गावरान तिळाचे भाव वाढले आहेत.
- अजित बोरा, तिळाचे व्यापारी मार्केट यार्ड
तिळाचे दर पाहुयात.. (प्रती क्विंटल)
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 10/01/2026 | ||||||
| अकोला | लोकल | क्विंटल | 25 | 7500 | 9525 | 8000 |
| मलकापूर | लोकल | क्विंटल | 5 | 9850 | 11350 | 10100 |
| अमरावती | पांढरा | क्विंटल | 2 | 8000 | 9000 | 8500 |
| मालेगाव | पांढरा | क्विंटल | 12 | 6500 | 9844 | 9600 |
| माजलगाव | पांढरा | क्विंटल | 4 | 9900 | 11600 | 10000 |
| पैठण | पांढरा | क्विंटल | 1 | 13600 | 13600 | 13600 |
| खामगाव | पांढरा | क्विंटल | 17 | 8000 | 8500 | 8250 |
| शेगाव | पांढरा | क्विंटल | 1 | 8000 | 8000 | 8000 |
